AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaye Khanna Dhurandhar : ‘धुरंधर’च्या तूफान यशानंतर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया, 4 शब्दांत म्हणाला..

5 डिसेंबरला धुरंधर रिलीज झाला असून दोन आठवड्यातच चत्रपाटने शेकडो कोटी कमावले आहेत. पिक्चर रिलीज झाल्यापासून जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी रेहमान डकैतची चर्चा होत्ये. अक्षय खन्नाने साकारलेली भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरून अनेकांनी त्याला ऑस्कर देण्याचीही मागणी केली आहे. पण या सगळ्या बद्दल, या यशाबद्दल अक्षयचं काय म्हणणं आहे ? त्याची प्रतिक्रिया पहिल्यांदाच समोर आली आहे...

Akshaye Khanna Dhurandhar : 'धुरंधर'च्या तूफान यशानंतर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया, 4 शब्दांत म्हणाला..
धुरंधरच्या यशाबद्दल काय म्हणाला अक्षय खन्ना ?Image Credit source: social media
| Updated on: Dec 18, 2025 | 10:16 AM
Share

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’ने (Dhurandhar) सगळे रेकॉर्ड्स तोडण्याचं ठरवलं आहे. अवघ्या 12-13 दिवसांत चित्रपटाने प्रचंड कमाई केली असून, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर पिक्चर चांगला सुरू असून त्याची घोडदौड दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. या चित्रपटाचं खूप कौतुक होतंय, सर्व कलाकाराचं काम नावाजलं जातंय, पण त्यापेक्षाही जास्त चर्चा आणि तारीफ होत्ये ती एकाच व्यक्तीची , तो म्हणजे अक्षय खन्ना(Akshaye Khanna). धुरंधरमध्ये त्याने रेहमान डकैत हा खलनायक साकारत नकारात्मक भूमिका केली आहे, मात्र त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होतंय. सर्वांनी त्याची तारीफ केली आहे, फराह खान, स्मृती इराणी यांसारख्या सेलिब्रिटींनी तर अक्षय खन्नाला ऑस्कर देऊन टाका, अशीही मागणी केली आहे.

या चित्रपटाने त्याला , त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. धुरंधरचं तूफान यश, जमवलेला गल्ला आणि कामाचं होणारं कौतुक या सगळ्यात अक्षय खन्नाचं काय म्हणणं आहे, ते अखेर समोर आलं आहे. या सर्वांबाबत अक्षय खन्ना याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला अक्षय खन्ना, ते जाणून घेऊया

‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया

आदित्य धर याने दिग्दर्शित केलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटात रेहामन डकैतच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड झाली, कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यानेच अक्षय खन्ना याला निवडलं. मुकेश छाब्राने नुकतीच मिस मालिनीला मुलाखत दिली, तेव्हा तो या सर्वांबद्दलमोरळेपणाने बोलला. ‘धुरंधर’च्या यशाबद्दल, त्याचं जे कौतुकं होत्यं त्याबद्दल अक्षय खन्ना याची पहिली प्रतिक्रिया काय हेही मुकेश छाब्रा यांनीच उघड केलं.

“मी आज सकाळी त्याच्याशी (अक्षय खन्ना) बोललो. धुरंधरच्या यशाबद्दल त्याचे काय मत आहे हेही मी त्याला विचारले. तो म्हणाला की त्याने (यशाने) फारसा फरक पडत नाही. पण त्याला ते खूप आवडलं. पण तो एवढाच बोलला, त्यापेक्षा अधिक काही तो बोलला नाही” असं मुकेश छाब्रा याने सांगितलं.

Akshaye Khanna : इकडे ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ, रेहमान डकैत हिट ! पण तिकडे अक्षय खन्ना मात्र..

‘जेव्हा मी सेटवर होतो, तेव्हा मी त्याची (अक्षय खन्ना) प्रोसेस पाहिली. तो एक सीन कितीतरी वेळा वाचून काढतो आणि संपूर्ण तयारीसह काम करतो. एवढंच नव्हे तर तो त्याचा ऑरा नीट सांभाळतो. पण असं असलं तरी तो त्याच्या स्वत:च्या जगात असतो, हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते’ असं निरीक्षणही मुकेश छाब्राने नोंदवलं.

अशा पद्धतीने मुकेश छाब्रा याने धुरंधरच्या यशाबद्दल अक्षय खन्नाच्या पहिल्या प्रतिक्रियेचा खुलासा केला. दरम्यान सर्व जग धुरंधरचं यश साजरं करत असतानाच अक्षय खन्ना मात्र त्याच्या अलिबागच्या घरात निवांत वेळ घालवत असून, तिथे त्याने वास्तूशांतीची पूजाही केल्याचे समोर आले. त्याच्या घरी ज्या गुरूजींनी पूजा केली, त्यांनीच यासंदर्भातले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, अक्षय खन्नासाठी त्यांनी खास पोस्टही लिहीली होती.

अक्षयचे आगामी चित्रपट

धुरंधर नंतर, चाहते अक्षय खन्नाच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाकाली हा त्याचा आगामी चित्रपट असून 2026 च्या मध्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो महाकालीमध्ये राक्षस गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.