AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : ‘धुरंधर’मधल्या रेहमान डकैतचं सर्वांना कौतुक, पण त्याच्या बायकोला आवडला..

'धुरंधर' चित्रपट रिलीज झाल्यापासूनच सगळीकडे अक्षय खन्नाच्या कामाची वाहवा होत्ये, जो बघावं तो रेहमान डकैतच्या भूमिकेची तारीफ करतोय. या चित्रपटात अभिनेत्री सौम्या टंडन हिने रेहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकरली आहे. तिला मात्र धुरंधरमधला एक वेगळाच सुपस्टार जास्त भावला... कोण आहे तो ?

Dhurandhar : 'धुरंधर'मधल्या रेहमान डकैतचं सर्वांना कौतुक, पण त्याच्या बायकोला आवडला..
धुरंधरबद्दल काय म्हणाली सौम्या टंडन ?
| Updated on: Dec 17, 2025 | 9:03 PM
Share

5 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, एका पात्राची तर स्वात जास्त चर्चा आहे,तो म्हणजे “रहमान डकैत”, ज्याच्या भूमिकेत अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) चार चाँद लावले आहेत. या भूमिकेसाठी अक्षयचं भरभरून कौतुक होत आहे. कोरिओग्राफर-दिग्दर्सिक फराह खानपासून ते अभिनेत्री-भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यापर्यंत अनेकांनी अक्षय खन्नाचं भरूभरून कौतुक करतल त्याला थेट ऑस्कर देण्याचीही मागणी केली. ‘धुरंधर’ या चित्रपटात रेहमान डकैतच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) दिसली होती. तिचं मात्र या काही वेगळंच म्हणणं आहे. सौम्या हिला या चित्रपटात अक्षय खन्ना याच्यापेक्षा दुसराच सुपस्टार जास्त आवडला आहे.

सौम्या टंडनला अक्षय खन्ना नव्हे आवडला हा सुपरस्टार

अलीकडेच, रेडिओ सिटीशी बोलताना सौम्या टंडनने धुरंधरबद्दल चर्चा केली. तेव्हा ती म्हणाली की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अक्षय खन्नाच्या भूमिकेची सतत चर्चा होत आहे आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. पण सौम्या हिच्या म्हणण्यानुसार, तिला या चित्रपटा अक्षय खन्ना याच्यापेक्षा अभिनेता रणवीर सिंग याचं काम जास्त आवडलं. सौम्याने रणवीरच्या अभिनयाचं भरूभरून कौतुक केलं आणि तो एक प्रगल्भ अभिनेता आहे, असंही ती म्हणाली.

धुरंधर बद्दल काय म्हणाली सौम्या टंडन ?

‘भाभी जी घर पर हैं’ या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेल्या सौम्या टंडनने ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्ना याने साकारलेल्या रेहमान डकैतच्या पत्नीची म्हणजेच उल्फतची भूमिका साकारली, तिला या चित्रपटात तेही अक्षय खन्नाच्या अपोझिट पाहणं हा तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. आता ‘धुरंधर’च्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली – ‘सर्वांनी मला सांगितले की तुझे सीन्स खूप कमी होते, पण तू खूप प्रभावी होतीस. एका अभिनेत्याला यापेक्षा अजून काय पाहिजे ? मी आदित्य (धर)ला विचारलं की (कामाने) माझी  प्रतिष्ठा तर राखली जाईल ना ? ते ऐकून तो (आदित्य धर) हसला आणि मला म्हणाला, तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे ‘ असा किस्सा सौम्याने सांगितला.

Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..

रणवीरस सिंह प्रगल्भ अभिनेता

या दरम्यान, सौम्या टंडन रणवीरबद्दल बोलताना म्हणाली, “मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे, या चित्रपटानंतर सगळे अक्षय (खन्ना) बद्दल बोलत आहेत, पण मला तुम्हाला सांगायचे आहे की, मला रणवीर आवडतो. त्या चित्रपटात त्याचे काही मूक भाग आहेत. एक सुपरस्टार म्हणून, एक हिरोच्या नाते. तो चूपचाप मागे उभा राहून अक्षय खन्नाला स्क्रीन देत आहे. तो अत्यंत सूक्ष्मपणे एका कलाकाराच्या नात्याने मागे उभा राहिलाया आणि शांत राहिला आहे. मला वाटतं की ही एका प्रगल्भ अभिनेत्याची निशाणी आहे”, अशा शब्दांत सौम्याने त्याचं कौतुक केलं.

धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धमाका

5 डिसेंबर रोजी ‘धुरंधर’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि अवघ्या 12 दिवसांतच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 411 कोटींची कमाई केली आहे, तर जगभरातील त्याचे कलेक्शन 620 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. विशेषतः या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई आश्चर्यकारक होती. फक्त दुसऱ्या रविवारी, चित्रपटाने 59 कोटींच्या कलेक्शनने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आदित्य धर दिग्दर्शित धुरंदरमध्ये रणवीर सिंग याच्यासह संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.