सहातास एकत्र घालवले, मग अचानक बॉयफ्रेंडच्या प्रायवेट पार्टवर ब्लेडने हल्ला, नेमकं दोघांमध्ये काय झालं?
सोमवारी विकासला त्याच्या प्रेयसीने फोन केला व भेटण्यासाठी घरी बोलावलं. रात्री विकास प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. दोघे सहावर्षांपासून एकमेकांना भेटत होते.

उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. खलीलाबाद कोतवाली भागात मुसहरा गावात एका प्रेयसीने प्रियकराचा प्रायवेट पार्टच कापून टाकला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर घरी पोहोचला. कुटुंबीय मुलाला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. खलीलाबाद कोतवाली भागात जंगल कलाचा निवासी विकास निषाद (19) सोमवारी शेजारच्या मुसहरा गावात राहणाऱ्या प्रेयसीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. दोघे सहावर्षांपासून एकमेकांना भेटत होते. सोमवारी विकासला त्याच्या प्रेयसीने फोन केला व भेटण्यासाठी घरी बोलावलं.
त्यानंतर रात्री विकास प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. दोघे सहातास एकत्र होते. विकासच्या प्रायवेट पार्टवर ब्लेडने हल्ला केल्याचा प्रेयसीवर आरोप आहे. हल्ल्यानंतर विकासच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला. विकास लटपटत कसातरी घरी पोहोचला. तिथे पाच तास रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण हालत बिघडली. कुटुंबियांना या बद्दल समजल्यानंतर त्याला घेऊन लगेच ते रुग्णालयात गेले. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये विकासवर उपचार करण्यात आले.
माझ्या मुलाचं आयुष्यात धोक्यात टाकलं
विकास बेशुद्ध अवस्थेत होता. रक्तस्त्रावामुळे विकासाला रक्त चढवण्यात आलं. त्यानंतर त्याला काही तासांनी शुद्ध आली. विकासची आई म्हणाली की, “ती मुलगी माझ्या मुलाच्या मागे लागली आहे. सोमवारी रात्री तिने माझ्या मुलाला भेटायला घरी बोलावलं. सकाळी त्याच्या प्रायवेट पार्टवर हल्ला केला. माझ्या मुलाचं आयुष्यात धोक्यात टाकलं”
हल्ला का केला?
सहातास सोबत घालवल्यानंतर त्यांच्यात कुठल्यातरी विषयावरुन भांडण झालं. संतापाच्याभरात प्रेयसीने प्रियकराचा थेट प्रायवेट पार्टच कापून टाकला. अजून या प्रकरणात कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असं खलीलाबाद कोतवाली पोलिसांनी सांगितलं. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करु असं सांगितलं.
