
लग्नात 51 तोळं सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार देउऊनही समाधान झालेल्या, सुनेचा हु्ंड्यासाठी छळ करणाऱ्या पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या क्रूर कृत्यांची माहिती आत्तापर्यंत सर्वत्र पोहोचली आहे. मोठ्या सुनेला छळलंच पण लहान सुनेलाही इतका त्रास दिला की तिने अखेर आपल्या 9 महिन्यांच्या मुलाचाही न विचार करता टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. गेल्या आठवड्यात वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली आणि तेव्हापासून हे प्रकरण सगळीकडे गाजू लागलं. राज्यात सध्या संतापाचं वातावरण असून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील तर अश्रू सुकून गेले आहेत. वैष्वणीचा अतोनात छळ करून तिला मरणाच्या दारात ढकलणाऱा तिचा नवरा, नणंद आणि सासू यांना तेव्हाच अटक झाली पण सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे सात दिवस फरार होते.
अखेर आज पहाटे पिंपरी पोलिसांनी त्यांना स्वारगेट येथून अटक केली. त्यांना आता लवकरच कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या सासरे-दीरांना अटक झाल्याची बातमी समजल्यानंतर तिचे आई-वडील, कस्पटे कुटुंब अतिशय भावूक झालं पण त्यांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे, प्रशासनाचे आणि हा विषय उचलून धरणाऱ्या माध्यमांचेही आभार मानले. वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर मकोका लावून त्यांना कठोरात शिक्षा व्हावी अशी मागणी कस्पटे कुटुंबाने केली असून तरच आपल्या गेलेल्या मुलीला न्याय मिळेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हगवणे कुटुंबावर मकोका लावा
वैष्णवीचा अतोनात छळ करून तिला जीव देण्यास भाग पाडणाऱ्या हगवणे कुटुबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिचे आई-वडील यांनी केली आहे. पती, नणंद, सासू,, घरातील लोकांनी वैष्णवीला खूप त्रास दिला. हगवणे कुटुंबियांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी कस्पटे कुटुंबीयांची मागणी आहे.
तसेच त्यांनी अजित पवारांचे आणि सर्व माध्यमांचे आभार मानले, त्यांच्यामुळे सासरे आणि दीर यांना अटक झाली, माझ्या मुलीला न्याय मिळतोय, असे वैष्णवीचे वडील म्हणाले.
वैष्णवीचे सासरे, दीर यांना अशा ठोकल्या बेड्या