“कॉल मी ” म्हणत अल्पवयीन मुलीला दिली चिठ्ठी, जवळीक साधण्याचाही प्रयत्न, सुरक्षा रक्षकाला अटक

मुंबईतील  महिला व मुलींविरोधातील अत्याचार, त्यांना होणार त्रास याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अगदी लहान मुलींपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत, कोणीच या शहरात सुरक्षित नाही का, असा प्रश्न दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांमुळे उपस्थित होतोय.

कॉल मी  म्हणत अल्पवयीन मुलीला दिली चिठ्ठी, जवळीक साधण्याचाही प्रयत्न, सुरक्षा रक्षकाला अटक
क्राईम न्यूज
| Updated on: May 18, 2025 | 11:51 AM

मुंबईतील  महिला व मुलींविरोधातील अत्याचार, त्यांना होणार त्रास याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अगदी लहान मुलींपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत, कोणीच या शहरात सुरक्षित नाही का, असा प्रश्न दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांमुळे उपस्थित होतोय. मुंबई उपनगरांपैकी एक असलेल्या विलेपार्ले येथेही असाचा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. “कॉल मी ” म्हणत अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देणाऱ्या,तिचा पाठलाग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी आहे. ती विलेपार्ले येथील एका सोसायटीमध्ये आईवडिलांसोबत राहते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलगी राहत असलेल्या निवासी सोसायटीतून पायी जात होती. तीच एकटीच असल्याचे पाहून आरोपी सुरक्षा रक्षकाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर ती मुलगी लिफ्टमध्ये जाण्यासाठी उभी असताना तो आरोपी तिच्याजवळ आला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला एक चिठ्ठी दिली. “कॉल मी ” म्हणत अल्पवयीन मुलीला त्याने चिठ्ठी दिली. मला फोन कर, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे आरोपीने पीडित मुलीला सांगितले.तिच्याशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला.

मात्र या सगळ्या प्रकारामुळे ती मुलगी खूप घाबरली. मात्र तिने चिठ्ठी उघडली असता त्याच आरोपीने चिठ्ठीमध्ये आपला मोबाईल क्रमांक व नाव लिहिले होते. घाबरलेल्या मुलीने कसंबसं घर गाठलं आणि घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने कुटुंबियांच्या मदतीने याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांकडे जात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.