Tennis Player Death : दु:खद, एका उमलणाऱ्या स्वप्नाचा करुण अंत, राष्ट्रीय युवा टेनिसपटूचं अपघाती निधन

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विश्वा दीनदयालनचा (Vishwa Deenadayalan) एका भीषण अपघातात मृ्त्यू झाला आहे. हा अपघात रविवारी गुवाहाटीहून शिलाँगला जात घडला आहे. तो 83 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत खेळायला जात होता. या वेदनादायक अपघातात विश्वाचे तीन सहकारी खेळाडू जखमी झाले आहेत.

Tennis Player Death : दु:खद, एका उमलणाऱ्या स्वप्नाचा करुण अंत, राष्ट्रीय युवा टेनिसपटूचं अपघाती निधन
भारताचा युवा टेनिसपटू विश्वा दीनदयालनचा भीषण अपघातात मृत्यू
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 18, 2022 | 9:43 AM

नवी दिल्ली – तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विश्वा दीनदयालनचा (Vishwa Deenadayalan) एका भीषण अपघातात मृ्त्यू झाला आहे. हा अपघात रविवारी गुवाहाटीहून शिलाँगला जात घडला आहे. तो 83 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत खेळायला जात होता. या वेदनादायक अपघातात विश्वाचे तीन सहकारी खेळाडू जखमी झाले आहेत. त्यात फक्त एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. झालेल्या दुर्घटमुळे अनेकांना दु:ख झाले आहे. महामार्गाच्या मध्ये असलेल्या वळणावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (Truck)धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ज्यावेळी ट्रकने ट्रॅक्सीला धडक दिली. त्यानंतर ट्रक 50 मीटर दरीत कोसळला आहे.

नेमकं काय झालं

तामिळनाडूचे हे टेबल टेनिसपटू गुवाहाटीहून शिलाँगला टॅक्सीने जात होते. वाटेत एका 12 चाकी ट्रेलरने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर विश्वला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. जागतिक राष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये खेळल्यानंतर, 27 एप्रिल रोजी, तो जागतिक टेबल टेनिस युवा स्पर्धक खेळण्यासाठी भारतीय संघासह ऑस्ट्रियाला जाणार होता.

हरियाणा सरकारकडून अर्थिक मदत जाहीर

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आणि म्हटले की, “तामिळनाडूचे पॅडलर, दीनदयालन विश्व यांचे री भोई जिल्ह्यात अपघाती निधन झाल्याचे ऐकून दुख वाटले. ते ८३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिलाँगला जात होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “तामिळनाडूतील युवा टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्व यांचा मेघालयातील री-भोई येथे 83 व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिलाँगला जात असताना अपघातात निधन झाल्याचे जाणून अतिशय दुःख झाले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहोत. हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि हरियाणा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी विश्व दीनदयाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

सहकारी तीन खेळाडू जखमी

जखमी खेळाडूंमध्ये तामिळनाडूचा रमेश कुमार, अबिनाश श्रीनिवासन आणि किशोर कुमार यांचा समावेश आहे. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमी किशोर कुमार यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे.

Loudspeaker Policy : नाशकात आता पोलीस आयुक्तांचं भोंग्यासाठी अल्टीमेटम, परवानगी घ्या, नाही तर 3 तारखेनंतर कारवाई, राज ठाकरे इफेक्ट?

Amethi : वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजण ठार तर चारजण जखमी; जखमींची प्रकृती चिंताजनक

Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..