धंदा बसल्यानं जीवावर उठला! तलवार, चॉपरने थरारक हल्ला! उल्हासनगरात व्यापाऱ्याच्या जीवावर कोण उठलंय?

| Updated on: Feb 05, 2022 | 12:07 AM

Ulhasnagar Crime : रवीच्या दुकानामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची आरोपी पवन गुप्ताची धारणा होती. यातूनच त्यानं 25 जानेवारीच्या पहाटे रवी पेसवानी याला जीवे मारण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला.

धंदा बसल्यानं जीवावर उठला! तलवार, चॉपरने थरारक हल्ला! उल्हासनगरात व्यापाऱ्याच्या जीवावर कोण उठलंय?
उल्हासनगरमधील धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरात एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा (attempt to murder) प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV Video) सुद्धा कैद झालीये. उल्हासनगरच्या कॅम्प एक (Ulhasnagar Camp one) भागात राहणाऱ्या रवी पेसवानी यांचं गोलमैदान परिसरात फास्ट फूड सेंटर आहे. याच परिसरात आरोपी पवन गुप्ता याचंही स्नॅक्स आणि ज्यूस सेंटर आहे. मात्र रवीच्या दुकानामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची आरोपी पवन गुप्ताची धारणा होती. यातूनच त्यानं 25 जानेवारीच्या पहाटे रवी पेसवानी याला जीवे मारण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी तिथून निसटून पळून गेला. यानंतर १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रवी हा गोलमैदान परिसरातून दुचाकीवर त्याच्या मित्रासह जात असताना पवन गुप्ता यानं आणखी 4 साथीदारांसह त्याला रस्त्यात थांबवत त्याच्यावर तलवार, चॉपर, हातोडा, स्टीलचा पाईप यानं हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

बालंबाल बचावला!

मात्र सुदैवानं रवी पेसवानी आणि त्याचा मित्र हे त्यांची गाडी तिथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी रवी याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पवन गुप्ता आणि त्याच्या साथीदारांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.

आरोपी मोकाटच

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नसून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपी अजूनही मोकाट असल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याची भीती तक्रारदार रवी पेसवानी याने व्यक्त केलीये. त्यामुळं पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी त्याने केलीये. एकूणच उल्हासनगर शहरात वाढती गुन्हेगारी पगता पोलिसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालीये.

पाहा हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Video | हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही! कांदिवलीत प्लॅटफॉर्मवरच चोर-पोलिसाचा थरार

तिघेही बंधाऱ्यात पडले! बाबा वाचले, आई बेपत्ता, नाकातोंडात पाणी जाऊन 1 वर्षाचं बाळ तडफडून दगावलं

Suicide | डिसेंबरमध्ये लग्न, महिन्याभरात आत्महत्या! कारण काय? तर पतीचा पगार अवघा 6 हजार