Video : अंबानींना धमकी देणारा तो कोण ? अखेर पोलिसांच्या ताब्यात

काही दिवसांपुर्वी ही धमकी देण्यात आली होती, तेव्हापासून आरोपीचा शोध पोलिस घेत होते.

Video : अंबानींना धमकी देणारा तो कोण ? अखेर पोलिसांच्या ताब्यात
Ambani Family
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 06, 2022 | 2:51 PM

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांना (Ambani Family) धमकी देणाऱ्याला अखेर पोलिसांनी (Mumbai Police) शिताफिने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे राकेश कुमार मिश्र याला बिहारमधून ताब्यात घेतले आहे. धमकीचा मॅसेज दिल्यानंतर तातडीने आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. तसेच फोन करणारी व्यक्ती कोणत्या टोळी संबंधित आहे का ? याची सुद्धा चौकशी होणार आहे.

काही दिवसांपुर्वी ही धमकी देण्यात आली होती, तेव्हापासून आरोपीचा शोध पोलिस घेत होते. आरोपी बिहारमध्ये असल्याची माहिती मिळताचं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.