AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलमध्ये ट्रान्स वुमनची ‘एअरहोस्टेस’ स्टाईल अनाउन्समेंट; Video पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू

मुंबई लोकलमध्ये ट्रान्स वुमन देवी वाघेला यांनी एअरहोस्टेस स्टाईलमध्ये केलेल्या मजेशीर घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि विनोदी संवादाने प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू आणले. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या अनपेक्षित क्षणाने मुंबईकरांना आनंद दिला आहे.

लोकलमध्ये ट्रान्स वुमनची ‘एअरहोस्टेस’ स्टाईल अनाउन्समेंट; Video पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू
रेल्वेत एअरहोस्टेसची अनाऊंन्समेंट
| Updated on: Mar 12, 2026 | 2:01 PM
Share

मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे फक्त प्रवासाचे साधन नाही, तर दररोज लाखो लोकांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अनुभवांची जागा आहे. गर्दी, धावपळ आणि वेळेची चिंता यामध्ये अनेकदा प्रवास थकवणारा ठरतो. पण कधी कधी असा एखादा क्षण येतो की संपूर्ण डब्यात हसू आणि आनंद पसरतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे असाच आनंदाचा माहोल तयार झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ट्रान्स वुमन देवी वाघेला यांनी मुंबई लोकलमध्ये अगदी वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने “फ्लाइट स्टाईल” अनाउन्समेंट केली. त्यांचा बोलण्याचा अंदाज, आत्मविश्वास आणि मजेदार डायलॉग ऐकून डब्यातील प्रवासीही आश्चर्यचकित झाले आणि सगळेच हसत-हसत त्याचा आनंद घेऊ लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांनी त्याला खूप पसंती दिली आहे. अनेक जण तो पुन्हा-पुन्हा पाहत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. काही क्षणांसाठी का होईना, पण या व्हिडिओने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.

वेलकम टू द ट्रेन

व्हिडिओमध्ये महिला डबा दिसतो. ट्रेनमध्ये बरीच गर्दी होती. अनेक जण बसून तर काही जणी उभ्या राहून प्रवास करत होत्या. तेवढ्यात डब्याच्या मध्ये उभी असलेली एक ट्रान्स वुमन अचानक अनाउन्समेंट करायला सुरुवात करते. तिचा अंदाज इतका आत्मविश्वासपूर्ण होता की क्षणभर वाटतं जणू एखाद्या फ्लाइटमध्ये टेकऑफपूर्वीची घोषणा सुरू आहे. पण प्रत्यक्षात हा सगळा प्रकार मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येच चालू होता. तिने हसत-हसत प्रवाशांना संबोधित केलं. मजेशीर पद्धतीने ती म्हणाली, “हॅलो, वेलकम टू द ट्रेन. कृपया आपली सीट बेल्ट काढा, कारण आपली ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे.” तिची ही वेगळी स्टाईल ऐकून सुरुवातीला प्रवासी थोडे आश्चर्यचकित झाले, पण लगेचच सगळ्या डब्यात हसू पसरते.

यानंतर ती आणखी एक मजेदार ओळ बोलते जी ऐकून लोक अजूनच हसायला लागतात. ती हलक्या-फुलक्या अंदाजात म्हणते, “तिकीटावर जे पैसे खर्च केलेत, ते आता परत मिळणार नाहीत, त्यामुळे आरामात खाली उतरा.” हे ऐकून डब्यातील प्रवाशांची हसणं थांबतच नाही आणि संपूर्ण वातावरण खूप आनंदी झालं.

गोड घोषणेचा लगेच काढला व्हिडीओ

घोषणेच्या शेवटी त्या खूप गोड आणि प्रेमळ पद्धतीने प्रवाशांना “थँक यू” असेही म्हणतात. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य स्पष्ट दिसत होतं. हा संपूर्ण क्षण इतका नैसर्गिक आणि रंजक होता, की तिथे असलेल्या अनेक प्रवाशांनी लगेच आपला मोबाईल काढून हा क्षण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं