नाशिकमध्ये महिलेवर कारमध्ये बलात्कार, तक्रार दाखल

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात एका महिलेची दुचाकी अडवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार (rape) केल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये महिलेवर कारमध्ये बलात्कार, तक्रार दाखल
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 5:57 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात एका महिलेची दुचाकी अडवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार (rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वावी ठाण्यात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Woman raped in car in Nashik, complaint lodged)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिन्नर तालुक्यातल्या शहा शिवारात सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने तिचा कारने पाठलाग सुरू केला. शेवटी त्याने महिलेला गाठले. महिलेच्या दुचाकीसमोर कार लावून अडवले. महिलेला बळजबरने आपल्या कारमध्ये टाकून दरवाजे बंद केले. महिलेने प्रतिकार आणि आरडाओरडा केला. मात्र, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. सोबतच महिलेचे मोबाइलमध्ये फोटो काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम 376, 341, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत.

शिक्षिकेवर बलात्कार

पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमरावतीतीतल्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनानी केली आहे. (Woman raped in car in Nashik, complaint lodged)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.