नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

फक्त वीस रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा कटरने गळा चिरून खून (murdere) केल्याची घटना नाशिकमधील (Nashik) पंचवटी (Panchwati) परिसरातील सेवाकुंज परिसरात घडली आहे. याप्रकरणी काही तासांत सीटीव्हीचा शोध घेत पोलिसांनी (Nashik Police) आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग
फक्त वीस रुपयांसाठी केला खून.

नाशिकः फक्त वीस रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा कटरने गळा चिरून खून (murdere) केल्याची घटना नाशिकमधील (Nashik) पंचवटी (Panchwati) परिसरातील सेवाकुंज परिसरात घडली आहे. याप्रकरणी काही तासांत सीटीव्हीचा शोध घेत पोलिसांनी (Nashik Police) आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत. मृताचे नाव सुनील असून, त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. (In Nashik, the young man’s throat was slit as he did not pay twenty rupees)

एका अज्ञात तरुणाचा मारेकऱ्यांनी गळा चिरल्याची घटना शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री उघड झाल्याने खळबळ उडाली होती. जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज खाली ही घटना घडली. यामुळे पोलिस खातेही हादरून गेले होते. एका अज्ञात तरुणाचा मारेकऱ्याने पाठलाग सुरू केला. तेव्हा त्याने जीवाच्या आकांताने धावतपळत काट्या मारुती पोलिस चौकीजवळचा पेट्रोल पंप गाठला. तेथून पुढे असलेल्या संघवी मिलसमोर बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारेकऱ्यांनी तरुणाचा गळा चिरला होता. त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. तेव्हा त्यांना जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज बाहेर रक्ताचे पडलेले डाग आणि काही कपडे दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. तेव्हा त्यात पंपावर एक व्यक्ती हात धुत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीची चौकशी करून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

तपोवनातील उद्यानात सापडला

पोलिसांनी संशयिताचा रामकुंड, झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, गोदाघाट परिसरात शोध घेतला. तेव्हा पंडित रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या हा तपोवनातील एका उद्यानात सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हाच्या कबुली दिली. संशयित पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या (वय ३२) यानेच मृताचा कटरने गळा चिरल्याचे उघड झाले. आरोपीच्या नावावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मृताचे नाव सुनील आहे. पोलिसांना त्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. (In Nashik, the young man’s throat was slit as he did not pay twenty rupees)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये सोने स्थिर, दहा ग्रॅमचे दर 47600 वर

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI