नाशिकमध्ये सोने स्थिर, दहा ग्रॅमचे दर 47600 वर

नाशिकमध्ये (Nashik) सोन्याचे दर (Gold Rate) स्थिर असून, शनिवारी (11 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47600 आहेत, अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, (Jewelers Association) महाराष्ट्रचे डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी दिली.

नाशिकमध्ये सोने स्थिर, दहा ग्रॅमचे दर 47600 वर
सोने स्थिर.

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) सोन्याचे दर (Gold Rate) स्थिर असून, शनिवारी (11 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47600 आहेत, अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, (Jewelers Association) महाराष्ट्रचे डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी दिली. (Gold prices stable in Nashik, The price of 24 carat gold per ten grams is 47,600)

गणपती बाप्पांचे शुक्रवारी शहरात मोठ्या दिमाखात आगमन झाले. कुठे ढोल ताशे, तर कुठे डीजेवर गाणे लावून बाप्पांच्या भक्तीचे सूर भाविकांनी आळवले. बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शुक्रवारी नाशिकमधील अनेक सराफा दुकाने बंद होती. अनेक दुकाने सुरू होती. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 होते. शनिवारी या दरातमध्ये कसलिही चढउतार झाली नाही. विशेष म्हणजे रविवारीही हेच दर राहणार आहेत. नाशिकमध्ये चांदीचे दर किलोमागे 66,500 रुपये असून, गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. नाशिकमध्ये गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर हे 48,390 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 47,390 होते. या तुलनेत सप्टेंबरमध्ये या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते.

दसऱ्याकडे डोळे

सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

रोखीच्या व्यवहारांसाठी KYC ची मागणी

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

सोने आणि चांदीचे भाव सध्या स्थिर आहेत. काल, आज आणि उद्या हेच भाव राहतील. आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 आहेत.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold prices stable in Nashik,The price of 24 carat gold per ten grams is 47,600)

इतर बातम्याः 

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI