Ahmednagar Crime : हातात तलवार घेऊन स्टेटस ठेवणे महागात पडले, स्टेटस व्हायरल होताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या

तलवार हातात घेतलेला तरुणाचा स्टेटस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर तोफखाना पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेऊन त्यास तलवारीसह अटक केली आहे.

Ahmednagar Crime : हातात तलवार घेऊन स्टेटस ठेवणे महागात पडले, स्टेटस व्हायरल होताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या
तलवार घेऊन फोटो ठेवणाऱ्या तरुणाला अटक
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 1:21 PM

अहमदनगर : हल्ली हातात हत्यारे घेऊन रील्स बनवणे, सोशल मीडियावर हत्यारे हातात घेऊन स्टेटस ठेवण्याचा जणू गुन्हेगारांमध्ये ट्रेंडच आला आहे. अशीच एक घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. एका तरुणाला आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर तलवारी घेऊन फोटो अपलोड करणे चांगले महागात पडले आहे. तलवार हातात घेतलेला तरुणाचा स्टेटस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर तोफखाना पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेऊन त्यास तलवारीसह अटक केली आहे. मतीन सय्यद समशोद्दीन असे अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

हातात तलवारी घेऊन फोटो स्टेटसवर ठेवला होता

आरोपी तरुण हा नगर शहरातील सर्जेपुरा भागातील रहिवासी आहे. मतीन याने दोन तलवारी हातात घेऊन फोटो काढून तो आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर लावला होता. मात्र तो फोटो चांगलाच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागला.

तरुणावर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

यानंतर तोफखाना पोलिसांनी याची दखल घेत तलवारीसह मतीन सय्यद याला ताब्यात घेतले होते. मतीन सय्यद समशोद्दीन याच्या विरोधात कलम 4/25 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नांदेडमध्ये मिरवणुकीत तलावारी नाचवल्या

नांदेडमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीनंतर काढलेल्या मिरवणुकीत नंग्या तलवारी नाचवण्यात आल्या. हदगांव तालुक्यातील मनूला गावातील हा धक्कादायक प्रकार आहे.

या मिरवणुकीत झालेल्या हाणामारीत एक जण जखमी देखील झाला. हदगांव पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. व्हायरल व्हीडिओच्या आधारे पोलीस यातील आरोपीचा शोध घेत आहेत.