गर्लफ्रेंडची हेरगिरी करत असल्याचा आला संशय, तरूणाने मित्रालाच संपवले

आरोपी तरूण हा एक मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र तो दुसऱ्या जातीतील असल्याने मुलीच्या कुटुंबियांना हे नातं पसंत नव्हतं.

गर्लफ्रेंडची हेरगिरी करत असल्याचा आला संशय, तरूणाने मित्रालाच संपवले
संशयावरून तरूणाने केली मित्राची हत्या
Image Credit source: tv9
| Updated on: May 19, 2023 | 4:07 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील गांधी नगर येथे एका हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका तरूणाने त्याच्याच खोलीत राहणाऱ्या मित्राची हत्या (murder) केली. तो हेरगिरी करत असल्याच्या संशयातून आरोपीने त्याचा गळा चिरून खून (crime news) केला. रोहित असे आरोपीचे नाव असून तो २० वर्षांचा आहे. तर शिवनाथ असे मृत तरूणाचे नाव असून तो २२ वर्षांचा होता.

ते दोघेही सीमागढी जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी होते. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनास्थळाहून हत्यारही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

दुसऱ्या जातीतील तरूणीवर होते प्रेम

खरंतर आरोपी रोहित हा एका तरूणीच्या प्रेमात पडला होता. मात्र दोघांचीही जात वेगळी असल्याने तरूणीच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. पण त्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांना एकमेकांपासून दूर व्हायचं नव्हतं. काही दिवसांपूर्वी रोहितच्या गावातील एक मुलगा आला व त्याच्यासोबत रूममेट म्हणून राहू लागला.

संशयावरून केली हत्या

सगळं काही ठीक सुरु होतं. त्याचवेळी रोहितल्या त्याच्या मित्रावर संशय आला. शिवनाथ हा आपली आणि गर्लफ्रेंडची हेरगिरी करत असल्याचा संशय त्याला आला. तो आपली सर्व माहिती घरच्यांना सांगतो, असेही त्याला वाटले. त्यामुळे त्या रागातून रोहितने त्याच्या मित्राचा ब्लेडन गळा चिरला.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रोहितने त्याच्या मित्राची हत्या केली. त्याच्यासोबत राहणाऱ्या इतर तरूणांनी घरमालकाला ही गोष्ट सांगितली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अचक केली असून पुढील तपास सुरू आहे.