आईकडून अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल, मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदाबाद: आई आणि मुलानेच एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील अहमदाबादमध्ये उघडकीस आला आहे.  या प्रकरणानंतर अहमदाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आई आणि मुलाने संबंधित मुलीचा अश्लिल व्हिडीओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील विंझोल परिसरात एक महिला कपड्यांचा व्यवसाय करते. त्या परिसरात राहाणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला …

अहमदाबाद: आई आणि मुलानेच एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील अहमदाबादमध्ये उघडकीस आला आहे.  या प्रकरणानंतर अहमदाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आई आणि मुलाने संबंधित मुलीचा अश्लिल व्हिडीओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील विंझोल परिसरात एक महिला कपड्यांचा व्यवसाय करते. त्या परिसरात राहाणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला ड्रेस खरेदी करायचा असल्यानं तिने तिच्याशी संपर्क साधला. तिथे गेल्यानंतर महिला आणि तिचा मुलगा ड्रेस दाखवण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी घेऊन गेले. मुलीने तिथे अनेक ड्रेस बघितल्यानंतर तिला त्यातील एक ड्रेस आवडला. ड्रेस आवडल्याने तिने तो चेंजिंग रुममध्ये जाऊन घालून बघितला. त्याचवेळी त्या महिलेने त्या मुलीचा कपडे बदलतानाचा  व्हिडीओ शूट केला. ती बाहेर आल्यानंतर महिलेने तिला हा व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तिला मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलीट करावा यासाठी तिला विनंती केली.

पण तिची गयावया न करत तिने तिच्या मुलासोबत शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. या धक्कादायक मागणीला मुलीने नकार देताच, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरलेल्या मुलीने तिची मागणी मान्य केली. यानंतर जवळपास दीड वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

मात्र सततच्या शारीरिक संबंधामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार स्वत:च्या आई-वडिलांना सांगितला. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तिचे नातेवाईक आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित मुलीच्या वैद्यकीय तपासण्या केला. तसंच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *