बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग, भावाच्या गोळीबारात चिमुरड्या भाचीचा मृत्यू

बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने केलेल्या गोळीबारात भाचीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या कैमुरमध्ये घडला

Brother Shot Sister, बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग, भावाच्या गोळीबारात चिमुरड्या भाचीचा मृत्यू

पाटणा : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने केलेल्या गोळीबारात भाचीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या कैमुरमध्ये घडला (Inter Caste Marriage). या निर्दयी भावाने रागाच्या भरात बहिणीवर गोळ्या झाडल्या, या घटनेत बहीण आणि तिची दोन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली (Love Marriage). त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचताच चिमुकलीचा मृत्यू झाला. तर बहिणीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला बनारसच्या रुग्णालयात हलवले (Brother Shot Sister).

घटस्फोटीत बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग

कैमुर येथील चैनपूरच्या मदूरना गावात ही महिला राहत होती. तिचा घटस्फोट झाला असल्याने ती वडिलांच्या घरा राहत होती. काही महिन्यांनी तिचे गावातील एका तरुणाशी प्रेम-संबंध जुळले. मात्र, तिच्या कुटुंबाला हे मान्य नव्हतं. कुटुंबातील लोकांनी अनेकदा त्यांच्या नात्याला विरोध केला. तरीही तिने त्या तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर घर चालवण्यासाठी ती चैनपूर बाजारातील ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती.

नेहमीप्रमाणे मंगळवारीही पीडिता ब्युटी पार्लरमधून काम आटोपून घर परतत होती. मात्र, यादरम्यान गावात पोहोचताच तिच्या भावाने तिच्यावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात पीडिता आणि तिची दोन वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेलं, मात्र इथे त्या चिमुकलीचा उपचारापूर्वीच मुत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. या प्रकरणातील आरोपी भाऊ सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *