भोसरी आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, वडिलांकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील भोसरी येथे काल (29 जुलै) जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलांची हत्या करत आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

भोसरी आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, वडिलांकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पुणे : पुण्यातील भोसरी येथे काल (29 जुलै) जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलांची हत्या करत स्वत:ही आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणात 9 आणि 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलींची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी मुलींच्या वडिलांना अटक केली आहे.

कर्नाटकला राहणारी 28 वर्षीय महिला फातिमा आपल्या फळ विक्रेता पतीसोबत काही दिवस भोसरीच्या तळेगाव दाभाडे येथे राहत होती. येथे त्यांनी भाड्याने घर घेतलं होते.

पैशांच्या वादातून पती-पत्नीमध्ये वाद असल्याचा संशय

महिलेचा पती एक फळ विक्रेता आहे. कर्नाटकवरुन आल्यानंतर तो कामाच्या शोधात होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान समोर आले की, पती-पत्नीमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पती घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो संध्याकाळी परत घरी आला. यानंतर त्याने पाहिले तर त्यांची तिन्ही मुलं आणि पत्नीने आत्महत्या केली होती.

संबधित बातम्या :  गरिबीला कंटाळून तीन मुलांची हत्या करुन आईचीही आत्महत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *