Ahmednagar School Reopen : अहमदगनरमध्ये आजपासून शाळा महाविद्यालय सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Feb 02, 2022 | 6:31 AM

राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यामुळं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Ahmednagar School Reopen : अहमदगनरमध्ये आजपासून शाळा महाविद्यालय सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

अहमदनगर : राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यामुळं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या (Student Health) सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्ण संख्या घटल्यानं 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यास शालेय शिक्षण विभागानं मंजुरी दिली होती. मात्र, शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानुसार काही जिल्ह्यातींल शाळा 24 जानेवारीला, काही ठिकाणी 1 फेब्रुवारीला शाळा सुरु झाल्या. आज अहमदनगर (Ahmednagar School Reopen) जिल्ह्यातील शाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानं सुरु आहेत. शाळांसोबत महाविद्यालय देखील सुरु होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना

अहमदगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 12 पर्यतंच्या शाळा आणि महाविद्यालये सुरु केली जाणार आहेत. शाळा आणि महाविद्यालय सुरु करताना कोरोना नियमांचं पालन करण बंधनकराकर करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण बंधनकारक

महाविद्यालय आणि शाळा सुरु करत असताना संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मुलांचं लसीकरण आणि पालकांचं संमतीपत्र आवश्यक

केंद्र सरकारनं दिलेल्या आदेशाप्रमाण 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यास 3 जानेवारीपासून सुरुवात केली आहे. त्या आदेशानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा किमान पहिला डोस घेतलेला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी संमतीपत्रक बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं संमतीपत्रक असेल त्यांना शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना ही जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 14 हजार नव्या रुग्णांची नोंद

Nagpur College | महाविद्यालयीन युवकांसाठी विविध सरकारी योजना; जाणून घ्या रोजगार, शिष्यवृतीची माहिती

Ahmednagar School Reopen from today as per orders of Collector Rajendra Bhosale