आयआयटी किंवा आयआयएम नाही, चक्क ‘या’ विद्यापीठातून शिक्षण घेत विद्यार्थ्याने मिळवले थेट 58 लाखांचे पॅकेज, चक्क..

आयआयटी किंवा आयआयएममध्ये प्रवेश घेण्यावर अधिकांचा भर असतो. आयआयटीमध्ये मोठी पॅकेज मिळतात आणि विदेशातील कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळते. यासाठी प्रत्येकाचा स्वप्न हे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे कायमच असते. आता थेट एका विद्यार्थ्याला 58 लाखांचे पॅकेज मिळाले आहेत.

आयआयटी किंवा आयआयएम नाही, चक्क 'या' विद्यापीठातून शिक्षण घेत विद्यार्थ्याने मिळवले थेट 58 लाखांचे पॅकेज, चक्क..
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 12:31 PM

मुंबई : आयआयटी आणि आयआयएमच्या विद्यार्थ्यांना चांगली पगार मिळते हे नेहमीच सांगितले जाते. हेच नाही तर त्यांचे प्लेसमेंट देखील होते. लाखोंच्या घरात या विद्यार्थ्यांना पॅकेज मिळते. यामुळे प्रत्येकाची इच्छा हीच असते की, आयआयटी आणि आयआयएममध्ये प्रवेश घेण्याची. थेट विदेशातील कंपनीमध्येही नोकरी करण्याची संधी मिळते. आयआयटी आणि आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्याची तयारी पालकांची देखील असते. मात्र, एका विद्यार्थ्याने नुकताच कमाल केलीये. हेच नाही तर त्याचे पॅकेज पाहून सर्वांचेच डोळे चक्रावत आहेत.

विशेष म्हणजे आयआयटी आणि आयआयएमच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पॅकेज या मुलाला मिळाले आहेत. 25 वर्षांचा अंशु सूद याने पंजाब विश्वविद्यालयात एमबीए केले. थेट कॅंपस प्लेसमेंटमध्ये त्याची निवड झाली आणि त्याला 58.48 लाखांचे पॅकेज मिळाले. विदेशातील एक बड्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी त्याला मिळाली.

अंशु सूद हा पंजाबच्या होशियारपुर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याला थेट सिंगापुरच्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळाली. सिंगापुरच्या तोलाराम ग्रुपमध्ये सेल्स मॅनेजर या पदावर त्याची निवड झाली आहे. आता लवकरच अंशु सूद हा सिंगापुरसाठी रवाना होईल. सध्या अंशु सूद याचे जोरदार काैतुक केले जातंय.

अंशु सूद याने सांगितले की, त्याला 20 लाखांच्या पॅकेजची अगोदरपासूनच अपेक्षा होती. मात्र, त्याला वाटले होते, त्यापेक्षाही अधिक पॅकेज मिळाले. अंशु सूदसाठी या गोष्टी इतक्या जास्त सोप्या नक्कीच नव्हत्या. 2020 ला तो एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र, त्यानंतर त्याने एमबीए करण्याचे ठरवले.

2020 मध्ये अंशु सूद ज्या कंपनीमध्ये काम करत होता. तिथे त्याला फार कमी पगार असल्याने त्याने एमबीए करण्याचा निर्णय घेतला. अंशु सूद याने सांगितले की, अभ्यासासोबतच तो सतत बातम्या आणि सध्याच्या चालू घडामोडीवर बारीक लक्ष देत असे. याचा फायदा झाल्याचे सांगताना देखील अंशु सूद हा दिसला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.