
आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये राज्यातील नवीन शिक्षण सुधारणांवर चर्चा झाली. या बैठकीत नारा लोकेश यांनी आंध्र प्रदेशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या LEAP उपक्रमाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना माहिती दिली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धर्मेंद्र प्रधान यांचे ट्वीट
नारा लोकेश यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी नारा लोकेश यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच प्रधान यांनी LEAP कार्यक्रमांतर्गत सिरू केलेल्या कामांचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रात चांगली बदल आणण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारचेही त्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.
Delighted to meet Cabinet Minister, Govt. of Andhra Pradesh, Shri Nara Lokesh in my office today.
He briefed me about the LEAP initiative launched by the Govt. of Andhra Pradesh. Appreciated him for the vigorous efforts he is undertaking for transforming the learning landscape… pic.twitter.com/Ie70SN4w4N
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) June 18, 2025
LEAP म्हणजे काय?
LEAP (Learning, Equity, and Access Pathways) म्हणजे ‘शिक्षण, समता आणि यशाचा प्रवेश मार्ग’. शाळा सुधारण्यासाठी चांगले शैक्षणिक वातावरण तयार करणे आणि भविष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशने हा उपक्रम चालवला आहे. याबाबत बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘मी शिक्षण मंत्रालयाला आंध्र प्रदेश मॉडेलचा बारकाईने अभ्यास करण्यास आणि राष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती घेण्यास सांगितले आहे.’
केंद्र सरकार आंध्र प्रदेशला पाठिंबा देणार
पुढे बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी असंही म्हटलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आंध्र प्रदेशला एक मजबूत शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत राहील. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने आंध्र प्रदेशला उच्च दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि नवीन उपक्रमाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे.’
दरम्यान, 16 आंध्र प्रदेश सरकारने 1300 अधिक सरकारी कनिष्ठ महाविद्यालयांमधील 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास साहित्य आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) साठी मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली होती.
यावर बोलताना नारा लोकेश यांनी म्हटले की, “आंध्र प्रदेश शिक्षण मॉडेल अंतर्गत एक परिवर्तनकारी उपक्रम सुरू केल्याचा अभिमान आहे. चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. हे मॉडेल आंध्र प्रदेशातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे स्वप्न पाहण्याची आणि महान गोष्टी साध्य करण्याची योग्य संधी देते.”