BITS Pilani कडून विद्यार्थ्यांना खुशखबर! B.Sc करायची संधी, अर्ज करा, शेवटची तारीख वाचा

विशेष म्हणजे या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्हालाही जर बिट्स पिलानी यांच्याकडून कम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी कोर्स करायची इच्छा असेल तर या संधीचा फायदा घेऊन लगेच अर्ज करा.

BITS Pilani कडून विद्यार्थ्यांना खुशखबर! B.Sc करायची संधी, अर्ज करा, शेवटची तारीख वाचा
BITS Pilani Bsc
| Updated on: Sep 17, 2022 | 11:06 AM

बिट्स पिलानी (BITS Pilani) ही खूप मोठी आणि नामवंत अशी एक संस्था आहे. बारावी नंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. बिट्स पिलानीमध्ये याआधी इंजिनिअरिंग पदवीचे पर्याय उपलब्ध होते. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (12th Students) एक महत्त्वाची बातमी आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (पिलानी) या संस्थेने बीएस्सी कम्प्युटर सायन्स (B.Sc) अभ्यासक्रम सुरू केलाय. विशेष म्हणजे या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्हालाही जर बिट्स पिलानी यांच्याकडून कम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी कोर्स करायची इच्छा असेल तर या संधीचा फायदा घेऊन लगेच अर्ज करा.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता बिट्स पिलानीमधून बीएस्सी करता येणारे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (पिलानी) या संस्थेने बीएस्सी कम्प्युटर सायन्स (B.Sc) अभ्यासक्रम सुरू केलाय.

हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलाय. या अभ्यासक्रमासाठी कोणताही बारावी पास विद्यार्थी अर्ज करू शकतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई किंवा बिट्सॅट परीक्षा (बिट्सॅट) देणे अजिबात बंधनकारक नाही.

बिट्स पिलानी वर्षातून दोनदा बीएससी इन कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम सुरु करणार आहे. नोव्हेंबर आणि जुलै या महिन्यांमध्ये हा कोर्स सुरु होणारे. सध्या नोव्हेंबर अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

कोण अर्ज करू शकतं?

  • कोणत्याही विषयात बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.
  • यापूर्वी इतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणारे.
  • जे वर्किंग आहेत, नोकरदार, व्यावसायिक तेही या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा

  • बीएस्सीला कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
  • अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 होती, मात्र ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे.