Vastu Shastra : घरात लक्ष्मी, विष्णू कमळ का लावावे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडं आणि रोपं सांगितली आहेत, ती जर तुमच्या घरात असतील तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. आज अशाच दोन झाडांबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ज्यांची नावं आहे, लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ, चला तर मग जाणून घेऊयात या वनस्पतींचे फायदे.

वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक झाडं आहेत, जे घरात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. जसं की तुळस, तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला सर्वात प्रिय असलेली वनस्पती आहे, ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो, घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, त्यामुळे वास्तुशास्त्रात घरात तुळस लावण्याचा सल्ला दिला आहे, त्याचप्रमाणे मनी प्लांट या वृक्षाला देखील अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई दोन्ही शास्त्रानुसार जर घरात मनी प्लांट असेल तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पैशांची आवक वाढते, या जशा शुभ वनस्पती आहेत, अशाच दोन शुभ वनस्पतींबाबत वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. त्या म्हणजे लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ, आज आपण त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या घरात अचानक आर्थिक समस्या निर्माण होऊ लागल्या, कोणतंही कारण नसताना गृहकलह वाढला, किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर अशा वेळी घरामध्ये लक्ष्मी कमळ किंवा विष्णू कमळ लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. या दोन वनस्पती जर तुमच्या घरात असतील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वास्तूदोष दूर होतो आणि तुमची सर्व प्रकारच्या समस्यांमधून सुटका होते.
वनस्पती कशी ओळखावी?
लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ ही वनस्पती कमी पाणी असलेल्या ठिकाणी डोंगराळ भागात आढळते, यांच्या फुलांचा रंग देखील कमळा सारखा असतो, लक्ष्मी कमळाच्या पानांचा रंग हा हिरवा असतो, तर विष्णू कमळाच्या पानाचा रंग हा बदल राहतो, कधी तो हिरवा असतो, तर कधी तो हलका तांबूस होतो. घरात लक्ष्मी आणि विष्णू कमळ लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
