परदेशात जाण्याची गरज नाही! भारतात उघडणार 17 विदेशी युनिव्हर्सिटीचे कॅम्पस, वाचा संपूर्ण लिस्ट

Foreign Universities Campus in India: शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या नियमांनुसार, १७ परदेशी विद्यापीठांना भारतात आपली कॅम्पस स्थापन करण्यासाठी 'लेटर ऑफ इंटेन्ट' जारी करण्यात आली आहेत.

परदेशात जाण्याची गरज नाही! भारतात उघडणार 17 विदेशी युनिव्हर्सिटीचे कॅम्पस, वाचा संपूर्ण लिस्ट
Foreign Universities Campus in India
| Updated on: Nov 28, 2026 | 10:01 AM

केंद्र सरकारने भारतातील उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. भारतीय सरकारने आंतरराष्ट्रीय दिशा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिक्षण मंत्रालयासाठीच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद सध्या मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले की, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या (UGC) नियमांनुसार, १७ परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेन्ट’ (LoI) जारी करण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये युनायटेड किंगडम (UK), अमेरिका (US), ऑस्ट्रेलिया आणि इटली येथील विद्यापीठांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, शिक्षण मंत्र्यांनी नमूद केले की, सुमारे २१ परदेशी उच्च शैक्षणिक संस्था आधीच देशात कार्यरत आहेत.

आता कोणत्या देशांमधील संस्था यात सामील होणार?

यूजीसी (UGC) द्वारे २०२३ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार, १७ परदेशी संस्थांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये युनायटेड किंगडम, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इटली येथील विद्यापीठांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या १७ विद्यापीठांची नावे आणि त्यांच्या प्रस्तावित कॅम्पस ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. संबंधित संस्थांकडून भविष्यात त्यांच्या कॅम्पसमध्ये राबवले जाणारे अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेबाबतचा तपशील जाहीर केला जाईल.

Loading...

‘लेटर ऑफ इंटेन्ट’ म्हणजे काय?

‘लेटर ऑफ इंटेन्ट’ म्हणजे कॅम्पस स्थापन करण्यासाठी मिळालेली प्राथमिक नियामक संमती असं आहे. पण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, अंतिम अधिकृत मंजुरी नाहीये. याचा अर्थ असा नाही की या १७ संस्थांपैकी कोणाचे कॅम्पस आधीच सुरु झाले आहेत किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तर ‘लेटर ऑफ इंटेन्ट’ मिळाल्यानंतर, संबंधित विद्यापीठाला ठरवून दिलेल्या अटी व शर्तींनुसार आपला कॅम्पस विकसित करावा लागतो. त्यानंतर, ‘युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन’द्वारे आवश्यक तपासणी पूर्ण करून आणि अंतिम मंजुरी मिळाल्यावरच, संबंधित संस्थेला भारतात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याची आणि प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी दिली जाईल.

अभ्यासासाठी कोणते विषय असणार?

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, परदेशी विद्यापीठे भारतात व्यवसाय, अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, वित्त, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता , सायबर सुरक्षा, गेम डिझाइन आणि बायोमेडिकल सायन्स यांसारख्या आधुनिक व व्यावसायिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम सुरू करण्याची प्लॅन करत आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांना होणार फायदा?

देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू झाल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिकायचं आहे त्यांना याचा फायदा होईल. जे आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे परदेशात जाऊ शकले नाहीत अशा लोकांना जास्त फायदा होईल. या लोकांना भारतात राहूनच आंतरराष्ट्रीय अध्यापन पद्धती, जागतिक नेटवर्क आणि संशोधन सुविधांचा अनुभव घेता येईल. याशिवाय तसेच प्रवास, परदेशातील राहणीमान आणि विमा यांवरील खर्चही वाचवता येईल. याव्यतिरिक्त, यूजीसीच्या नियमांनुसार, या परिसरांद्वारे प्रदान केलेल्या पदव्यांना संबंधित परदेशी विद्यापीठाच्या मुख्य परिसराद्वारे दिल्या जाणाऱ्या पदव्यांइतकीच मान्यता मिळायला हवी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us