CBSE 12th Board Exam 2021: सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता, ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात?

| Updated on: May 25, 2021 | 10:28 AM

बारावी परीक्षांबद्दलचा निर्णय 1 जून रोजी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. CBSE 12th Board Exam 2021

CBSE 12th Board Exam 2021: सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता, या तारखेपासून परीक्षेला सुरुवात?
सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर, अशी डाऊनलोड करा मार्कशीट
Follow us on

CBSE 12th Board Exam 2021नवी दिल्ली:केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बारावीच्या परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करु शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घेणार असल्याची माहिती आहे. सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येण्याची शक्यता आहे. सीबीएसईतर्फे या परीक्षेचं आयोजन दोन टप्प्यात होणार असल्याची देखील माहिती आहे. पहिला टप्पा 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 8 ते 26 ऑगस्ट असा असणार आहे. (CBSE 12th Board Exam 2021 cbse likely to conduct exam in two phase from 15 july to 26 August)

1 जूनला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक झाल्यांनंतर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत, अशी घोषणा केली होती. तर, त्यावेळी बारावी परीक्षांबद्दलचा निर्णय 1 जून रोजी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. सीबीएसई आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय येत्या अंतिम निर्णय 1 जून रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

बारावी परीक्षेबाबत सूचना कळवण्याचा अखेरचा दिवस

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकार आणि राज्य परीक्षा बोर्डांकडून अभिप्राय मागवला आहे. राज्यांनी त्यांचा बारावी परीक्षा संदर्भातील सविस्तर अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पाठवण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.

सीबीएसईचं मत काय?

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयांची परीक्षा घेऊ शकते. तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सीबीएसई परीक्षेचा वेळ कमी करुन बहूपर्यायी स्वरुपात परीक्षेचं आयोजन करु शकते. यामुळे परीक्षेच्या पेपरचा वेळ देखील कमी होणार आहे. बहूपर्यायी म्हणजेत वस्तूनिष्ठ पद्धतींनं परीक्षा घेतल्यास परीक्षेचा वेळ तीन तासांवरुन दीड तासांवर येईल. सीबीएसईच्या मुख्य विषयांच्या यादीमध्ये एकूण 20 विषय आहेत. या विषयापैकी 4 विषय प्रत्येक विद्यार्थ्यानं निवडणं अपेक्षित असतं.

संबंधित बातम्या:

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम, दोन दिवसांत अंतिम निर्णय‌, सूत्रांची‌ माहिती

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

(CBSE 12th Board Exam 2021 cbse likely to conduct exam in two phase from 15 july to 26 August)