दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम, दोन दिवसांत अंतिम निर्णय‌, सूत्रांची‌ माहिती

महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला होता, याला धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम, दोन दिवसांत अंतिम निर्णय‌, सूत्रांची‌ माहिती
परीक्षा
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 2:52 PM

मुंबई: महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला होता. या निर्णयाला पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राज्य सरकार दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील रविवारी पत्रकारांशी बोलताना कोरोनाची तिसरी लाट आणि विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार नाही, असं देखील म्हटलं होतं. ( Maharashtra SSC exam cancelled state government will take final decision on the exam)

दहावीच्या परीक्षा रद्द

महाराष्ट्र सरकारनं कोरोना परिस्थितीचा विचार करुन दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेकप्रकरणी आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. ही बाब न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

बारावीच्या परीक्षा कधी?

बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या बोर्डाची बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी उच्चस्तरीय बैठकी केल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

सीबीएसईनं यापूर्वी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकताना 1 जूनला निर्णय जाहीर करु असं म्हटलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासासाठी वेळ दिला जाईल, असं देखील सांगितलं गेलं होतं. त्यामुळे बारावीच्या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील होऊ शकतात.

संबंधित बातम्या:

HSC board 12th exam : बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा?

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

( Maharashtra SSC exam cancelled state government will take final decision on the exam)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.