AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Credit Card: शेतकर्‍यांना मोठा दिलासा, RBI बदलणार KCC नियम, आता मिळणार जास्त कर्ज आणि होणार हा मोठा फायदा

Kisan Credit Card: देशातील शेतकर्‍यांना जलद आणि सहज कर्ज सुविधा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठा फेरबदल करण्याची तयारी सुरू केली आहे. काय आहे हा बदल ,काय होणार परिणाम?

Kisan Credit Card: शेतकर्‍यांना मोठा दिलासा, RBI बदलणार KCC नियम, आता मिळणार जास्त कर्ज आणि होणार हा मोठा फायदा
किसान क्रेडीट कार्डImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 11, 2026 | 12:13 PM
Share

Kisan Credit Card: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे शेतीशी संबंधित कर्जाचे स्वरुप बदलणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तसेच परतफेडीचा कालावधी सुद्धा अधिक असण्याची शक्यता आहे. आरबीआय आता बँकांना इंटीग्रेटेड आणि अपडेटेड मार्गदर्शक सूचना देणार आहे. त्यामुळे कृषी कर्जाचे स्वरुप, मंजूरी आणि वापर याची माहिती समोर येईल.

KCC चा कालावधी 6 वर्षे?

सर्वात महत्त्वाच्या प्रस्तावांपैकी KCC चा कालावधी सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा आहे. याचा अर्थ आता शेतकरी आता क्रेडिट कार्डअंतर्गत मिळणारे कर्ज हे दीर्घ कालावधीसाठी वापरतील आणि परतफेड करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक योजना सोप्या होतील. हंगामानुसार शेतकऱ्यांना परतफेड करणे सोपे होईल.

कर्ज पुरवठा आणि मर्यादा बदलणार

कर्ज पुरवठा आणि मर्यादा बदलणार आहे. शेतकऱ्यांच्या Scale of Finance सोबत कर्ज मर्यादा जोडण्याचा RBI प्रयत्न आहे. याचा अर्थ असा आहे की शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या खर्चानुसार, अचूक आणि योग्य क्रेडिट मिळत राहिल. त्यांना एक ठराविक रक्कम मिळणार नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

कृषी आवजारं KCC कर्जाअतंर्गत

आता शेतीशी निगडीत कृषी आवजारं, आधुनिक कृषी उपकरणं, स्मार्ट कृषी उपकरणं आणि इतर कृषी औद्योगिक आवजारे आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर येणार आहे. शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानल्या जात आहे. केसीसी अंतर्गत नियम अधिक सुसंगत, स्पष्ट आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर कर्जासंबंधीचे नियम अधिक स्पष्ट असल्याने झटपट कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आता हे नियम कधीपासून लागू होणार याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा