AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेल-व्हीआय विसरा, जिओने आणला खिशाला परवडणारा रिचार्ज, खास ऑफर काय?

123 रुपयांचा प्रीपेड प्लॅन इतक्या कमी किमतीत 28 दिवसांची वैधता देत आहे. जर तुम्हालाही हा स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा असेल तर कोणती कंपनी इतका स्वस्तात रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत तसेच या प्लॅनमध्ये कोणते फायदे आहेत आणि कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

एअरटेल-व्हीआय विसरा, जिओने आणला खिशाला परवडणारा रिचार्ज, खास ऑफर काय?
jio
| Edited By: | Updated on: Feb 10, 2026 | 2:10 PM
Share

नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यानी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. त्यातच वाढत्या रिचार्जच्या किंमती पाहता जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. रिलायन्स जिओकडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत रिचार्ज प्लॅन आहे, जो 28 दिवसांची वैधता देतो. या 28 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत फक्त 123 रूपये आहे. या 123 रूपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांला किती GB डेटा मिळेल? या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळतात? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

या प्लॅनची ​​किंमत कमी आहे परंतु त्याची वैधता दीर्घकाळ आहे, म्हणजेच डेटापेक्षा वैधता पसंत करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याव्यतिरिक्त यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस सेवा मिळत आहे.

जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटावर, या प्लॅनमध्ये एकूण 14 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.

अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, रिलायन्स जिओ या प्लॅनसह जिओ टीव्ही आणि जिओ सावन सारखे फायदे देखील देईल. या अतिरिक्त फायद्यांसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

टिप: तर एअरटेल किंवा व्होडाफोन आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे 28 दिवसांच्या वैधतेसह इतका स्वस्त प्लॅन येत नाहीत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा जिओ प्लॅन जिओभारत फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हीही जिओभारत फोन वापरत असाल तर तुम्ही 123 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर हा प्लॅन निरुपयोगी आहे कारण कंपनी जिओभारत फोन वापरकर्त्यांना फक्त 123 रुपयांमध्ये 28 दिवसांचा फायदा देत आहे.