AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..

Shivsena MP Opration Tiger : उद्धव ठाकरे यांच्या गटातील तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यांनी कालच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षनिधी आणि विकासकामांसाठी आपण एकनाथ शिंदे गटात जात असल्याचे या खासदारांनी जाहीर केले. मात्र, या खासदारांच्या विकासनिधीबाबत मोठी माहिती पुढे येत आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
6 MP Shinde faction
| Updated on: Jun 23, 2026 | 11:12 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत थेट आरोप केला की, आम्हाला आमच्या मतदार संघासाठी निधीच मिळत नाही. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. ज्या अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांची कामे पुर्ण होत नाहीत, यामुळे आम्ही शिवसेना ठाकरे गट सोडत आहोत, अशी भूमिका फुटीर खासदारांनी घेतली. मात्र, यादरम्यानच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. विकासनिधीचे कारण सांगून शिवसेना ठाकरे गटाला राम राम करणाऱ्या खासदारांबद्दल मोठी माहिती पुढे आली. शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या 2 वर्षात मिळालेल्या निधीची माहिती आता समोर आलीये. संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6 टक्केच निधी आतापर्यंत खर्च केला. खासदार संजय दिना पाटिल यांनी मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केले नाही. तर ओमराजे निंबाळकर यांनी 18 कोटी निधीपैकी 2 कोटींचाच निधी आतापर्यंत खर्च केला.

शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या बंडखोरी खासदारांचे रिपोर्ट कार्ड पुढे आले. संजय ऊर्फ बंडू जाधव यांना मंजूर निधी 14 कोटी 70 लाख आहे. त्यापैकी त्यांनी खर्च केलेला निधी हा 3 कोटी 78 लाख आहे. पूर्ण काम 56 पैकी 25 आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी मंजूर निधी हा 18 कोटी 50 लाख आहे तर त्यापैकी त्यांनी खर्च केलेला निधी हा 1 कोटी 97 लाख आहे. पूर्ण केलेली कामे 130 पैकी 21 आहेत.

नागेश पाटील आष्टीकर यांना मंजूर निधी 19 कोटी आहे. त्यापैकी खर्च निधी हा 5 कोटी 6 लाख आहे. 79 पैकी त्यांनी 28 कामे पूर्ण केली. भाऊसाहेब वाकचाैर यांना मंजूर निधी 14 कोटी 7 लाख यापैकी खर्च निधी 71 लाख. यात पूर्ण कामे 135 पैकी फक्त 2. खासदार संजय दिना पाटील यांचा मंजूर निधी 14 कोटी 70 लाखा. यापैकी खर्च निधी 15 लाख, पूर्ण कामे 40 पैकी 0. संजय देशमुख मंजूर निधी 18 कोटी 6 लाख. यापैकी खर्च निधी 1 कोटी 42 लाख. 106 पैकी 7 काम पूर्ण. हा खासदारांचा 2 वर्षांचा लेखाजोखा आहे.

विकासकामांना निधी मिळत नसल्यानेच आपण हा निर्णय घेत असल्याचे बंडखोरी केलेल्या खासदारांकडून वारंवार सांगितले जात होते. काल या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, आता या खासदारांच्या 2 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पुढे आला, ज्यावरून आकडेवारी काही वेगळेच सांगून जात आहे. पक्षनिधी आणि विकासकामांसाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याची भूमिका फुटील खासदरांनी घेतली.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!