AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सोडून गेलेल्या खासदारांवर टीका करताना राऊतांनी सरकारवरील मोठा आरोप काढला खोडून

Sanjay Raut : "2029 ला देशाच्या राजकारणात काय होईल याची कोणी गॅरेंटी देऊ शकत नाही. मिंधे खुर्चीवर राहतील की नाही, मोदी पंतप्रधानपदी राहतील की नाही याची गॅरेंटी नाही. बहुमत चंचल असतं हे मिंध्याला अजून माहित नाही. आम्ही यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिले आहेत. फक्त आम्ही पैशांच राजकारण केलं नाही" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : सोडून गेलेल्या खासदारांवर टीका करताना राऊतांनी सरकारवरील मोठा आरोप काढला खोडून
Sanjay Raut
| Updated on: Jun 23, 2026 | 11:26 AM
Share

विकासकामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून ठाकरे गटाच्या खासदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत यांनी स्वत:च आकडे सांगून हे आरोप खोडून काढले. म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांची सरकारकडून विकास निधीसाठी कुठलीही अडवणूक होत नाही हे स्पष्ट झालं. “काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा नाशिक विधान परिषदत निवडणुकीत पराभव झाला. भाजपची सर्व मत गोकुळ गीतेना पडली. पण पुढल्या दोन तासात गोकुळ गीतेना विकत घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणलं. हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललय. पैसा फेको तमाशा देखो” असं संजय राऊत म्हणाले. “झाकलेले पुतळे जसे उघडतात, तसे काल झाकलेले गद्दारांचे पुतळे मिंधेंनी उघडून दाखवले. काय म्हणाले, आम्ही त्यांचा मान-सन्मान ठेऊ. मग,आमच्या पक्षात मान-सन्मान नव्हता का, आमच्या पक्षात अधिक मानसन्मान, स्वाभिमान होता” असं संजय राऊत म्हणाले.

“यांचा मानसन्मान ठेवणार म्हणजे ५० कोटी ७५ कोटी प्रत्येकाला मिळालेले आहेत. आता हे मानसन्मान निधीसाठी गेले. आकडे आलेत, जो निधी आहे तो ही धड हे वापरु शकले नाहीत. १५-१६ कोटीचा निधी पडून आहे. मग जे आकडे समोर आलेले आहेत, तो निधी का वापरला गेला नाही. कोणी तुम्हाला अडवलेलं विकासासाठी. निधी वापरला नाही. आता तुम्ही कोणात्या निधीसाठी गेलात. एका खासदारांचा १६ कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त पाच २५ लाख खर्च केलेत. या नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. २०० कोटीची कामं मिळणार, त्यातले २५ टक्के थेट घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीत कमिशन मिळणार. जनता खुळी नाही” असं राऊत म्हणाले. “मिंधे गटातला पोपट म्हणाला हे पाळणाघर आहे का, शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचं काम मिंधे गटाने केलं. बाळासाहेब ठाकरेंनी वृद्धाश्रम आणि पाळणाघरं काढली. याच पाळणाघरातून तुम्ही पुढे गेलात. नाहीतर कोणी विचारला असतं, कुपोषणाने मेला असता” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं केली

“पहिल्यांदा युती सरकार आल्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. पाळणाघर, वृद्धाश्रम ही मनावतेची काम आहेत. तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं केली” असा आरोप संजय राऊत यांनी केला. मतदारसंघातील जनता यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे 27 तारखेपासून या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. अशी माहिती राऊत यांनी दिली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?