AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh: क्रिकेटर रिंकु सिंह याला लाखोंचा गंडा? फेसबूक अकाऊंट हॅक; ईमेल आयडीच नाही तर बँकेचा तपशीलही बदलला, अपडेट काय?

Cricketer Rinku Singh Facebook account hacked: क्रिकेट जगतातील या खेळाडूला मोठा झटका बसला आहे. रिंकु सिंहचे फेसबूक खाते हॅक झाले आहे. हॅकर्सने कुणाला मोठा गंडा घातला, काय आहे नेमकं प्रकरण?

Rinku Singh: क्रिकेटर रिंकु सिंह याला लाखोंचा गंडा? फेसबूक अकाऊंट हॅक; ईमेल आयडीच नाही तर बँकेचा तपशीलही बदलला, अपडेट काय?
क्रिकेटर रिंकु सिंह फेसबुक खाते हॅकImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 06, 2026 | 5:20 PM
Share

Cricketer Rinku Singh Facebook account hacked : क्रिकेट जगतातील उमदा खेळाडू रिंकु सिंह याला मोठा झटका बसला आहे. त्यांचे फेसबूक खाते हॅक झाले आहे. सायबर भामट्यांनी त्याचे खाते हॅक केले. अलिगड पोलिसांच्या सायबर शाखेने याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तसेच तपास सुरू केला आहे. पोलिसांनुसार रिंकु सिंह याचे फेसबूक खाते दुसरीच कोणती तरी व्यक्ती विना परवानगी चालवत होते. रिंकु सिंह याच्या भावाने सायबर सेलला याविषयीची तक्रार केली. त्याआधारे एफआयआर नोंदविण्यात आला. हॅकर्सने रिंकु सिंह याचे लॉगिन क्रेडेंशियल बदलले. त्याने रिंकु सिंह याच्या नावे अनेक पोस्ट केल्या. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणात हॅकर्सने कुणाला गंडा घातला का, कुणाला पैसे मागितले का, काही व्यवहार झाला का, या सर्वच कोणातून तपास पूर्ण करण्यात येत आहे.

हॅकर्सने ईमेल ID आणि बँकेचा तपशील बदलला

वृत्तानुसार, हॅकर्सने रिंकु सिंह यालाच मोठा गंडा घालण्यात आल्याचे प्रथमदर्शनी अंदाज आहे. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिंकु सिंह याचे फेसबुकवर 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हे खातं मोनेटाईज्ड आहे. हॅकर्सने ई-मेल आयडी आणि रिंकु सिंहचा बँक खाते बदलले. काही दिवसांपूर्वी रिंकु सिंह याने त्याचे फेसबुक खाते तपासले. तेव्हा फेसबुक आयडी आणि पासवर्ड या आधारे तो लॉग इन करण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते शक्य झाले नाही. तर त्याच्या बँक खात्याचा तपशीलही वेगळंच काही सांगत होता. त्यामुळे मग रिंकु सिंह याला संशय आला. हॅकर्स त्याच्या फेसबूक खात्यातून मोठी कमाई चोरत असल्याचे समोर आले. रिंकु सिंह याने हा प्रकार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवला. त्यानंतर त्यांचा भाऊ सोनू सिंह याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानुसार, रिंकु सिंह याचा फेसबुक ID हा त्याच्या पर्सनल ईमेल आयडीशी जोडलेला होता. पण हॅकर्सने त्याचा ईमेल आयडी हटवला आणि त्याजागी एक व्यावसायिक ईमेल आयडी जोडला. त्यामुळे कमाईची सर्व माहिती आणि कमाईची रक्कम ही इतर खात्यात जाऊ लागली.

अकाऊंट रिकव्हरी प्रक्रिया सुरू

या तक्रारीनंतर सायबर सेल सक्रिय झाला. पोलिस आता तो IP एड्रेस आणि ईमेल ID ट्रॅक करत आहे, ज्या आधारे रिंकु सिंह याच्या मुळ खात्यात मोठा बदल करण्यात आला. अकाऊंट रिकव्हरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी फेसबुक, मेटाच्या अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. याप्रकारामुळे सर्वच सेलिब्रिटी आणि खेळाडूंना ही धक्का बसला आहे. सायबर भामट्याने मोठ्या चतुराईने ही प्रक्रिया केल्याने ती लक्षात आली नाही. आता रिंकु सिंह याला कितीचा गंडा घालण्यात आला. फसवणूक करण्यात आली हे काही समोर आले नाही.

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल