AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो पूर्व विदर्भातील नेता कोण? फाईलवर सही करण्यासाठी अजितदादांना थांबवलं होतं का? रोहित पवारांचा सवाल

अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. यानंतर आज १३ दिवस झाले तरी या प्रकरणाची चौकशी जैसे थे परिस्थितीत आहे. यावर आज युवानेते रोहित पवार यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.

तो पूर्व विदर्भातील नेता कोण? फाईलवर सही करण्यासाठी अजितदादांना थांबवलं होतं का? रोहित पवारांचा सवाल
rohit pawar and ajit pawar
| Updated on: Feb 10, 2026 | 6:01 PM
Share

अजितदादा यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषदेत घेत अनेक संशय व्यक्त केले आहे. एक मोठा राजकीय नेता आपल्यातून निघून जातो. अशा अपघातातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालायच हवीत हे या पत्रकार परिषदेचा हेतू आहे असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.अजितदादांना विमानाने आयत्यावेळी का जावे लागले याबद्दलचा घटनाक्रमही रोहित पवार यांनी यावेळी सांगितला आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले की या मागे घातपात आहे का? मलाही शंका आहे. हा कदाचित घातपात असू शकतो. आम्ही रिसर्च करत असताना सेक्युरिटी एरियात काम करणारा व्यक्ती आला. तो म्हणाला, इस्त्रायल माहीत आहे. मोसाद माहिती आहे का. तो म्हणाला मला हे पुस्तक वाच. त्यात एक लाईन आहे. ती वाच. डेगन नावाच्या व्यक्तीची माणस मारण्याची टेक्निक आहे. एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर त्याचा चालकला मारलं तर विषयच संपला, असं तो डेगन म्हणायचा.

अजितदादा यांच्या विमान अपघाती मृत्यू संदर्भात दीड तासांचे प्रेझेटेन्शन यावेळी रोहित पवार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की हा घातपात आहे अशी राज्यभरात चर्चा आहे. त्याच्या खोलात आपल्याला जावं लागेल. राज्यातील मोठा नेता गेला, ही गोष्ट काही लाईटली घेता येत नाही. जोपर्यंत उत्तरं मिळत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.

२७ तारखेला बैठका झाल्यावर अजितदादांनी अधिकाऱ्यांना सांगितले की आपण आता पाच तास काम करु. एक मोठे नेते दादांना भेटायला येणार होते. ते उशिरा आले. मुळे चर्चेत वेळ दवडला गेला. त्यामुळे दादा गाडीने जाणार होते, ते विमानाने गेले. त्यामुळे त्यांनी अखेर विमान बूक केले. पूर्व विदर्भातील एक नेते आहेत. दादांचे मोबाईल चेक करा. रोहित पवार पुढे म्हणाले की सही करावीच लागते. फार महत्त्वाची फाईल आहे. असं त्यांना सांगितलं गेलं. फाईल घरी नव्हती. मंत्रालयात होती. फाईल येईपर्यंत वेळ गेला. ट्रॅफिक होतं. म्हणून फाईल उशिरा आली. त्यामुळे वेळ गेला. दादांनी फाईलवर सही केली. त्यातही वेळ गेला असेही ते म्हणाले.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा