AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर अजितदादा… माझे काका आपल्यात असते; रोहित पवार यांनी केला सर्वात मोठा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेकांनी या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आता या संदर्भात पवार कुटुंबातील युवा नेते रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन सादर करीत सवाल केले आहेत.

...तर अजितदादा... माझे काका आपल्यात असते; रोहित पवार यांनी केला सर्वात मोठा गंभीर आरोप
rohit pawar
| Updated on: Feb 10, 2026 | 6:01 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजितदादा यांच्या निधनानंतर आता विमानाचे ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे.या अपघाताला १३ दिवस झाले आहेत. या अपघातानंतर १० तारखेला आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज दृकश्राव्य माध्यमावर आधारित प्रेझेंटेशन सादर करीत सरकारला अनेक सवाल केले आहेत.

विमानासाठीचे एक एप आहे. हे एक युनिव्हर्सल एप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं, तर १६ वर्षापूर्वीचं हे विमान आहे. २५ आणि २६ ला हे विमान सुरतला जाऊन आलं होते. कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होते. मेंटेन होते. वैमानिक अनुभवी आहे. अपघात व्हिजिबिलीटीमुळे झाल्याची शक्यता आहे. मात्र या स्थानिक गावातील लोकांचे म्हणणे आहे की विमानाचा आवाज विचित्र येत होता. रोज विमान यायचे. पण या विमानाचा आवाज वेगळाच येत होता असे एका महिलेने सांगितल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले. या गावाच्यावरून विमान गेलं तेव्हा आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल. विमान आलं टिल झालं आणि पडलं. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं. हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले नसतं तर या अपघाताबद्दल मोघम बोललं गेलं असते असेही रोहीत पवार यावेळी म्हणाले.

अपघात झाल्यानंतर १३-१४ दिवसात काहीच झालेले नाही. तर फक्त सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले आहे.त्यामुळे आम्हाला हे पडलेले प्रश्न आहेत.चौकशी मॅन्युप्युलेट केली जाऊ शकतात असाही आरोप त्यांनी केला आहे. या विमानाचा २०२३ ला विमानाचा अपघात झाला होता. आयलेस सिस्टीम बारामतीत नसल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मोठमोठी विमाने लँड होत होती. मुंबईत तर आयलेस सिस्टिम होती. तिथे या विमानाचा कसा अपघात झाला. व्हिजीबिलिटीवर कसं ढकलून देता येईल. काही तरी झाले असेल असे रोहीत पवार यावेळी म्हणाले.

तर हा माझे काका आज आपल्यात असते

मुंबई विमानतळावर २०२३ ला अपघात झाला. त्याचा आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. अजितदादांच्या अपघात झाल्यावर बातम्या झाल्या. डीजीसीला जाग आली. आणि सप्टेंबरमध्ये 2023च्या अपघाताचा रिपोर्ट देणार असल्याचे म्हटलं. यावरून व्हिएसआरचं त्यावर नियंत्रण आहे. हा रिपोर्टच आला नाही. त्यामुळे अपघात कसा झाला ते कळलं नाही. रिपोर्ट दाबला गेला. तो दाबला नसता तर अजितदादा, माझे काका आज आपल्यात असते असेही भावूक होत रोहित पवार यावेळी म्हणाले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात