CBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी?

| Updated on: May 28, 2021 | 11:09 AM

सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षा रद्द करण्या संदर्भातील याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. CBSE exam Supreme Court

CBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी?
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची याचिका अ‌ॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर सोमवारी सुनावणी होणार आहे. (CBSE board exam 2021 Supreme Court of India adjourned hearing petition demanding cancelling board exam to 31 may)

सुनावणी स्थगित का झाली?

न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सीबीएसई बोर्डाच्या वकिलांना याचिकेची अ‌ॅडव्हान्सड कॉपी देण्यास सांगितलं आहे.ममता शर्मा यांच्या याचिकेवर सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. आयसीएसई बोर्डाकडून ज्येष्ठ वकील जे.के.दास सुनावणीला हजर होते.

सीबीएसईचे देशभरात 14 लाख विद्यार्थी

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातून 14 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. भारतातील सर्व परीक्षा बोर्डांची विद्यार्थ्यांची संख्या दीड कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य परीक्षा मंडळाचे बारावीची विद्यार्थी संख्या 14 लाख असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे 30 मे आणि 1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात.

संबंधित बातम्या:

सीबीएसईच्या परीक्षांचं काय होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी होणार

CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न

(CBSE board exam 2021 Supreme Court of India adjourned hearing petition demanding cancelling board exam to 31 may)