CBSE Class 12 English Answer Key 2021 : सीबीएसई बारावीची इंग्रजी विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? वाचा सविस्तर

सीबीएसईच्या बारावीच्या मुख्य विषयांची पहिल्या सत्राची परिक्षा 1 डिसेंबरपासून आजपासून सुरु झाली आहे. आज बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला.

CBSE Class 12 English Answer Key 2021 :  सीबीएसई बारावीची इंग्रजी विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? वाचा सविस्तर
CBSE
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 3:18 PM

CBSE Term 1 exam नवी दिल्ली : सीबीएसईच्या (CBSE) बारावीच्या (Class 12 Term 1 Exam) मुख्य विषयांची पहिल्या सत्राची परिक्षा 1 डिसेंबरपासून आजपासून सुरु झाली आहे. आज बारावीचा इंग्रजी (English) विषयाचा पेपर झाला. सीबीएसईकडून बारावीच्या वर्गाची इंग्रजी विषयाची उत्तरतालिका महाविद्यालयांना पाठवण्यात येणार आहेत. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या आधारे इंग्रजीच्या पुस्तकाचा आधार घेतल्यास उत्तरे मिळू शकतात. टर्म 1 परीक्षेसंदर्भातील अधिक अपडेट्स www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.

नव्या शिक्षण धोरणानुसार दोन सत्रात परीक्षा

नरेंद्र मोदी सरकारनं नवीन शिक्षण धोरण लागू केलं आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विद्याथ्यांना बहूपर्यायी प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षेत दिर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील.त्यानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा सुरु झाल्या आहेत.

परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परीक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेला आहे.

प्रश्न कसे असणार?

सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात आहे. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर नोंदवावी लागत आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यानं यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.

ऑफलाईन परीक्षा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 2021 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. बोर्डाने टर्म -1 परीक्षा 50 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेचं आयोजन केलं आहे.

इतर बातम्या:

CBSE Datesheet of 10th-12th Term-1 exam: सीबीएसई दहावी बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जारी, 30 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरु

CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, प्रश्नांचं स्वरुप कसं असणार

CBSE term 1 exam class 12 English subject 2021 22 how to check answer key