CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता

| Updated on: Feb 14, 2022 | 11:51 AM

सीबीएसईकडून (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (CTET) निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल 15 फेब्रुवारीला जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईकडून (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (CTET) निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल 15 फेब्रुवारीला जाहीर होईल, अशी शक्यता आहे. सीटीईटीचा निकाल ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. परीक्षेत बसलेले उमेदवार या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील. सीटीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते . सीटीईटी परीक्षा यावेळी पहिली ते पाचवी या वर्गांसाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्यांसाठी पेपर 1 आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी पेपर 2 ची परीक्षा घेण्यात येते.

सीटीईटी परीक्षा 16 डिसेंबर ते 30 जानेवारी दरम्यानं घेण्यात आली. पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक 2 चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सीटीईटी परीक्षा निकाल सीटीईटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60 टक्के तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 55 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.

सीटीईटी निकाल 2021-22: कसे तपासाल?

स्‍टेप 1: नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
स्‍टेप 2: मुख्यपृष्ठाकडे खाली स्क्रोल करा आणि निकालासाठी दुव्यावर क्लिक करा.
स्‍टेप 3: आपणास नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपल्याला लॉगिन करावे लागेल.
स्‍टेप 4: आता आपला रोल नंबर प्रविष्ट करा आणि सबमिट करा

गेल्यावर्षीचा निकाल कसा होता?

गेल्या वर्षी झालेल्या सीटीईटी परीक्षेत पेपर 1 मध्ये एकूण 4,14,798 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले तर पेपर 2 मधील एकूण 2,39,501 उमेदवार उत्तीर्ण झाले. पेपर 1 साठी एकूण 16,11,423 उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर पेपर 2 साठी 14,47,551 उमेदवारांनी अर्ज केले होते.

डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होणार मार्कशीट

सीबीएसईच्या इतर निकालाप्रमाणं सीटीईटी उमेदवारांची मार्कशीट डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होईल. गुणवत्ता प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये अपलोड केले जाईल आणि पात्र उमेदवाराला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लॉगिन तपशील प्रदान केला जाईल. सीटीईटी मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्रामध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर क्यूआर कोड असेल. क्यूआर कोड डिजीलोकर मोबाईल अॅपद्वारे स्कॅन आणि सत्यापित केले जाऊ शकतात.

इतर बातम्या:

Nashik Election | झेडपी प्रारूप आरखडा आठवडाभरात होणार प्रसिद्ध; निवडणूक वेळेत होणार का?

तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?