आयसीएसईचा मोठा निर्णय, दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात

| Updated on: Jul 11, 2021 | 12:29 PM

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने ICSE आणि ISC परीक्षा 2022 या शैक्षणिक वर्षासाठी प्रमुख विषयांसाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. cisce syllabus reduction

आयसीएसईचा मोठा निर्णय, दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात
exam
Follow us on

नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने ICSE आणि ISC परीक्षा 2022 या शैक्षणिक वर्षासाठी प्रमुख विषयांसाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएसईच्या cisce.org या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होईल. वेबसाईटवरील माहितीनुसार दहावीच्या वर्गासाठी इतिहास आणि नागरिक शास्त्र, भूगोल, गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जैव शास्त्र, अर्थ शास्त्र, वाणिज्यिक अध्ययन, कॉम्प्युटर, गृहविज्ञान आणि पर्यावरण यासह इतर विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. (cisce class 10-12 exams board decided to reduce syllabus of major subject for this academic year )

बारावीच्या कोणत्या विषयांचा अभ्यासक्रम कमी केला?

आयएससीच्या बारावीच्या वर्गासाठी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, समाज शास्त्र, मानसशास्त्र, अर्थ शास्त्र, वाणिज्य, लेखा, व्यवसाय, संगणक शास्त्र, पर्यावरण, जैव तंत्रज्ञान यासह इतर विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डानं 2 जुलै रोजी दहावी आणि बारावीसाठी इंग्रजी आणि भारतीय भाषांच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे.

सीबीएसई वर्षातून दोन वेळा परीक्षा घेणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी (5 जुलै) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार यंदा वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 ला दोन भागात विभागलं आहे. प्रत्येक सत्रात जवळपास 50 टक्के अभ्यासक्रम ठेवला जाईल. मागील सत्राप्रमाणे 2021-22 च्या अभ्यासक्रमातही कपात केलीय. याबाबत या महिन्यात नोटिफिकेशनही काढण्यात येणार आहे

सीबीएसईनुसार 2021-22 शैक्षणिक वर्षात व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून विभागणी केलीय. विभाजित अभ्यासक्रमाच्या आधारावरच सीबीएसई वर्षात दोन वेळा परीक्षा आयोजित करणार आहे. सीबीएसईने म्हटलं, “शैक्षणिक सत्राच्या शेवटापर्यंत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्याची शक्यता कायम रहावी म्हणून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असं असलं तरी या शैक्षणिक वर्षात शाळांना बोर्डाचा अभ्यासक्रमच पूर्ण करायचा आहे. शाळांना अभ्यासक्रम लागू करण्यासाठी NCERT कडून इनपूट घेता येणार आहे.

प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क अधिक विश्वासार्ह होणार

इंटरनल असेसमेंट/ प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट वर्कला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय घोषणा केलेल्या निर्देशांमुळे या सर्व गोष्टींना सारखे गुण देणं वैध होणार आहे.

संबंधित बातम्या:

CBSE 10th Result 2021: सीबीएसईचा निकाल अंतिम टप्प्यात, काहीच दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

(cisce class 10-12 exams board decided to reduce syllabus of major subject for this academic year )