‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं अध्यासनं सुरु करावीत’, उदय सामंतांची सूचना

| Updated on: May 17, 2022 | 8:04 PM

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषि वित्त महामंडळाचे अध्यक्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ चारुदत्त मायी, कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं अध्यासनं सुरु करावीत, उदय सामंतांची सूचना
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारोह
Image Credit source: Twitter
Follow us on

नाशिक : राज्यपाल (Governor) तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 27 वा वार्षिक दीक्षांत समारोह (Annual Convocation) संपन्न झाला. यावेळी नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या (Open University) मुख्यालयातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषि वित्त महामंडळाचे अध्यक्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ चारुदत्त मायी, कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापनेपासून 50 ते 60 लाख पदव्या प्रदान केल्याचे सांगून मुक्त विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता इंदोर, गोवा, हैद्राबाद, दुबई यांसह मराठी लोक जिथे आहेत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा असं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मुक्त विद्यापीठाने त्यांच्या नावांचे अध्यासनं सुरु करावीत अशी सूचना सामंत यांनी केली.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सोहळा संपन्न

दीक्षांत समारोहात 176113  स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी व  पीएच डी प्रदान करण्यात आल्या. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ज्ञानदान प्रक्रियेचा वेदकाळापासून आढावा घेताना आगामी काळात मुक्त विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा देखील लाभ घ्यावा, असं आवाहन राज्यपालांनी केले. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

हे सुद्धा वाचा