बारावीनंतर पुढं काय? परकीय भाषेतील अभ्यासक्रम आणि संधी

| Updated on: Aug 18, 2021 | 8:06 AM

बारावीचा निकाल लागल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची लगबग सुरु झालीय. मुंबई विद्यापीठानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केलीय. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा या पारंपारिक शाखा समजल्या जातात.

बारावीनंतर पुढं काय? परकीय भाषेतील अभ्यासक्रम आणि संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई: बारावीचा निकाल लागल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची लगबग सुरु झालीय. मुंबई विद्यापीठानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केलीय. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा या पारंपारिक शाखा समजल्या जातात. विद्यार्थी पारंपारिक विद्याशाखांच्या पलीकडं जाऊन नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नवीन शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परकीय भाषा अभ्यासक्रम ही देखील चांगली संधी आहे.

परकीय भाषांचं महत्व

परकीय भाषांचं ज्ञान घेणं म्हणजे जगभरातल्या मोठ्या समुदायाशी जोडणं होय. भारतात जागतिकीकरण, उदारीकरणानंतर अनेक परकीय कंपन्या आल्या आहेत. परकीय कंपन्यांमंध्ये किंवा परदेशात नोकरीच्या अनेक करिअर संधी उपलब्ध होतात. भारतात जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी आणि चिनी भाषांचे परकीय अभ्यासक्रम चालवले जातात. परकीय भाषांचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी चांगल्या पगाराची संधी आहेत.परकीय भाषांचा अभ्यासक्रम आणि त्या भाषा शिकल्यानंतर भाषांतरकार आणि दुभाषक म्हणन काम करता येते.

परकीय भाषांमधील अभ्यासक्रम

परकीय भाषा शिकण्यासाठी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. देशातील विविध विद्यापीठात फ्रेंच, जपानी, पर्शियन, जर्मन, कोरियन स्टडिज, रशियन स्टडिज, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, लॅटिन अमेरिका भाषांचा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घेतले जातात.

डिप्लोमा अभ्यासक्रम

बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना परकीय भाषा अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना किमान 45 टक्के गुण मिळालेले असणं आवश्यक आहे.

महाराष्ट्रात अभ्यासक्रम कुठे?

भारतातील सर्व मोठ्या विद्यापीठांमध्ये परकीय भाषा अभ्यासक्रम चालवले जातात. विद्यापीठात परकीय भाषा पदविका व पदवी अभ्यासक्रम घेतले जातात. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परकीय भाषांचे अभ्यासक्रम चालवले जातात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रम

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परकीय भाषा विभाग अभ्यासक्रम 1949 मध्ये सुरु करण्यात आला. एलिमेंटरी ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस या विभागातर्फे चालवेल जातात. विभागात सकाळ आणि दुपारच्या सत्रात अभ्यासक्रम चालवले जातात. दरवर्षी 1500 विद्यार्थी प्रवेश घेतात.

विभागातर्फे चालवले अभ्यासक्रम

सर्टिफिकेट, इंटेन्सिव सर्टिफिकेट, डिप्लोमा, इंटेन्सिव डिप्लोमा, अ‌ॅडव्हान्सड डिप्लोमा, स्पेशल डिप्लोमा कोर्सेस अभ्यासक्रम फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी, आणि स्पॅनिश भाषांमध्ये चालवले जातात.

इतर बातम्या

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्ट कुठे पाहायची?

धर्मेंद्र प्रधानांची जामिया मिलियाच्या कुलगुरुंकडून भेट, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांबाबत सकारात्मक चर्चा

Courses and Career opportunities in foreign languages after class 12