AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधानांची जामिया मिलियाच्या कुलगुरुंकडून भेट, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांबाबत सकारात्मक चर्चा

धर्मेंद्र प्रधान यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नवीन कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी दिली आहे.

धर्मेंद्र प्रधानांची जामिया मिलियाच्या कुलगुरुंकडून भेट, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांबाबत सकारात्मक चर्चा
धर्मेंद्र प्रधान
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 11:35 AM
Share

नवी दिल्ली: जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी नुकतीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. धर्मेंद्र प्रधान यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नवीन कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी दिली आहे.

नव्या शिक्षणमंत्र्यांशी पहिल्यांदा चर्चा

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाशी संबंधित बाबींवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कुलगुरू नजमा अख्तर यांच्यातील हा पहिला संवाद होता. अलीकडच्या काळात जामियानं राबवलेल्या उपक्रमांची आणि विद्यापीठाच्या कामाची शिक्षणमंत्र्यांना चांगली माहिती असल्याचं समजल्यानं आनंद झाल्याचे कुलगुरूंनी सांगितले. अध्यापन आणि संशोधनामध्ये विद्यापीठाच्या योगदानाबद्दल प्रोत्साहन वाढवणार मार्गदर्शन त्यांनी केलं, असं नजमा अख्तर म्हणाल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी जामियाने एनआयआरएफ आणि इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले स्थान सुधारल्याबद्दल अभिनंदन केलंय.

शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरुंनी संशोधनासातील पुरस्कारासाठी शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले की संशोधनासाठी अभ्यागत पुरस्कारासाठी एक जामिया विद्याशाखा निवडली गेली असल्याची माहिती दिली. विद्यापीठातील 8 जणांना प्रधानमंत्री संशोधन फेलोशिप (PMRF) मिळालीय त्यात7 मुली आहेत. विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचंही प्रा. नजमा अख्तर यांनी सांगितलंय.

कौशल्य विकासाचे ‘हब’ बनवणार

नजमा अख्तर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जामियाला कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी ‘हब’ म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कौशल्य विकास कार्यक्रम बाजारपेठेतील गरजेनुसार तयार केले जातील. परदेशी भाषा शिकणे देखील भारतातील आणि परदेशातील विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी कोर्सचा एक भाग असेल, असं सांगण्यात आलंय.

कौशल्य विकास अॅप

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री वीरेंद्र कुमार यांनी नुकतेच अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचार्यांसाठी कौशल्य विकासाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी शनिवारी एक ऑनलाइन पोर्टल आणि अॅप लाँच केले.

इतर बातम्या:

Mumbai University: मुंबई विद्यापीठ पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार, मेरिट लिस्ट कुठे पाहायची?

AICTE Academic Calendar:अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून वार्षिक वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा

Education Minister Dharmendra Pradhan skill program JMI Vice Chancellor Najma Akhtar meet with Minister

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.