बारावी, पदवीनंतरचे अभिनय प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम, मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरु

| Updated on: Aug 20, 2021 | 7:42 AM

चित्रपट आणि नाट्य विभाग, महाराष्ट्राची समृद्ध लोककलांची परंपरा आणि यूट्यूब आणि वेबसिरीज सारखं नव्यानं निर्माण झालेलं माध्यम यामुळं अभिनय क्षेत्राचं क्षितीज वाढताना दिसत आहे.

बारावी, पदवीनंतरचे अभिनय प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम, मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरु
mumbai university
Follow us on

मुंबई : आपल्या देशात मनोरंजन हे क्षेत्र सातत्यानं वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राला नाट्य आणि चित्रपट सृष्टीचा गौरवशाली इतिहास आहे. चित्रपट आणि नाट्य विभाग, महाराष्ट्राची समृद्ध लोककलांची परंपरा आणि यूट्यूब आणि वेबसिरीज सारखं नव्यानं निर्माण झालेलं माध्यम यामुळं अभिनय क्षेत्राचं क्षितीज वाढताना दिसत आहे. विद्यापीठांचे युवा महोत्सवामध्ये अभिनय करणारे विद्यार्थी यांना देखील चित्रपट आणि नाटक क्षेत्रात करिअर करायचं असल्यास अभिनयाचं शिक्षण घेणं देखील आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन अभिनय कौशल्य विकसित करण्याची चांगली संधी आहे.

महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून अभिनय आणि नाट्य प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवले जातात. बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थी अभिनय प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस आणि अभिनय कौशल्य पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत. विद्यापीठानं जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार 26 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मास्टर ऑफ थिएटर आर्टस हा 2 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. तर, अभिनय कौशल्य पदविका अभ्यासक्रम हा 1 वर्षाचा आहे. वरील दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज व माहितीपत्रक मुंबई विद्यापीठांच्या वेबसाईटवर उफलब्ध आहेत.

पात्रता

मास्टर ऑफ थिएटर आर्टस अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज सादर करु शकतो. याशिवाय नाटकाचा अनुभव असणारे विद्यार्थी देखील अर्ज सादर करु शकतात. तर, अभिनय कौशल्य पदविका अभ्यासक्रम हा बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे ते अर्ज दाखल करु शकतात. नाटक आणि शॉर्ट फिल्ममध्ये अनुभव असणारे विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात.

पुढे काय?

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि शिवाजी विद्यापीठातही नाट्यशास्त्राचे अभ्यासक्रम चालवले जातात. विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात. अभिनय कौशल्याचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी चित्रपट, नाटक, वेब सिरीजमध्ये काम करु शकतात. अभिनय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पीएच.डी देखील करता येऊ शकते.

इतर बातम्या:

अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार, मराठा आरक्षणाबाबतच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय!

पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Courses in acting and dramatics afters class 12 and Graduation Mumbai University courses admission process started