CSIR UGC NET 2022 ॲडमिट कार्ड, वेळापत्रक आणि बरंच काही, एका क्लिकवर

| Updated on: Sep 13, 2022 | 5:08 PM

सीएसआयआर नेट प्रवेशपत्र लिंक सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. https://csirnet.nta.nic.in या लिंकवर हे प्रवेशपत्र उपलब्ध आहे.

CSIR UGC NET 2022 ॲडमिट कार्ड, वेळापत्रक आणि बरंच काही, एका क्लिकवर
CSIR NET 2022 Exam Admit Card
Image Credit source: Social Media
Follow us on

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR), नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर नेट जून २०२२ परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सीएसआयआर नेट प्रवेशपत्र लिंक सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. https://csirnet.nta.nic.in या लिंकवर हे प्रवेशपत्र उपलब्ध आहे. यावर्षी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट 2022 परीक्षा 16, 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सकाळची शिफ्ट सुरू होणार आहे. दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते 6:00 दरम्यान घेण्यात येईल.

सीएसआयआर नेट ॲडमिट कार्ड 2022 कसे डाउनलोड करावे

  1. सीएसआयआर नेट परीक्षा 2022 चे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी csirnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. आता होमपेजवर ‘सीएसआयआर नेट 2022 ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.
  3. पासवर्ड म्हणून तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.
  4. तुमचं सीएसआयआर नेट 2022चं ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  5. ते डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.

सीएसआयआर यूजीसी नेट ॲडमिट कार्ड डाउनलोड करा

संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट 2022 परीक्षेचं वेळापत्रक

  • 16 सप्टेंबर 2022: पृथ्वी, वातावरणीय, महासागर आणि ग्रह विज्ञान, भौतिक विज्ञान (सकाळची शिफ्ट)
  • 16 सप्टेंबर 2022: गणितीय विज्ञान (संध्याकाळची शिफ्ट)
  • 17 सप्टेंबर 2022: जीवन विज्ञान (सकाळची शिफ्ट), जीवन विज्ञान (संध्याकाळची शिफ्ट)
  • 18सप्टेंबर 2022: केमिकल सायन्सेस (सकाळची शिफ्ट)

उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित परीक्षा केंद्रांवर सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

वेळापत्रकात काही गोंधळ झाल्यास उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिकृत सूचनेनुसार, सीएसआयआर नेट प्रवेशपत्र आज, 13 सप्टेंबर 2022 रोजीच जारी केले जाणार होते, जे आता उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.