AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: शुबमन गिल पुन्हा एकदा फॉर्मात! फटकेबाजीचा व्हिडीओ आला समोर

भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलसोबत काहीच बरोबर घडत नाही. टी20 संघात वारंवार संधी देऊनही फेल गेला. त्यानंतर टी20 वर्ल्डकप संघातूनही नावं कापलं गेलं. असं असताना शुबमन गिलने पुन्हा एकदा जोरदार सराव सुरू केला आहे.

Shubman Gill: शुबमन गिल पुन्हा एकदा फॉर्मात! फटकेबाजीचा व्हिडीओ आला समोर
शुबमन गिल पुन्हा एकदा फॉर्मात! फटकेबाजीचा व्हिडीओ आला समोरImage Credit source: PTI
| Updated on: Dec 25, 2025 | 8:59 PM
Share

शुबमन गिलकडे बीसीसीआय भविष्यातील मोठी गुंतवणूक म्हणून पाहात आहे. रोहित शर्मानंतर त्याच्याकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा सोपवली. तसेच टी20 संघाचं उपकर्णधारपदही सोपवलं होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघात शुबमन गिल खेळणार हे स्पष्ट दिसत होतं. पण त्याच्या ग्रहांनी काही त्याला साथ दिली नाही असंच म्हणावं लागेल. वारंवार संधी देऊनही शुबमन गिल फेल गेला. त्याला दिल्या जाण्याऱ्या संधींमुळे बीसीसीआय टीकेचं धनी ठरलं होतं. अखेर बीसीसीआयने त्याला टी20 वर्ल्डकप संघातून वगळलं. पण शुबमन गिल पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागला आहे. ख्रिसमसच्या दिवशी शुबमन गिलने चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याने सरावात जोरदार फटकेबाजी करत पुनरामगनासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. त्याच्या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुबमन गिलने कुठे आणि कशी फलंदाजी केली ते जाणून घ्या.

शुबमन गिलने केली जबरदस्त फलंदाजी

शुबमन गिल पुन्हा एकदा गेलेला फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी मैदानात घाम गाळत आहे. गुरूवारी मोहालीच्या पीसीए मैदानात त्याने सराव केला. यावेळी त्याने आक्रमक फटकेबाजी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुबमन गिलने फिरकीपटूंना लांब शॉट्स मारले. त्याच्या बॅट स्विंगनंतर पुन्हा एकदा त्याला लय मिळाल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळीची आवश्यकता असते. पण शुबमन गिलमध्ये त्याची उणीव दिसून आली होती. आता त्यात सुधारणा करत असल्याचं दिसून येत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघात बरीच उलथापालथ होणार आहे. शुबमन गिलला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.

शुबमन गिलने वनडे आणि कसोटी धावा केल्या आहेत. कारण त्याची खेळण्याची पद्धत सुरुवातीला स्लो आणि सेट झाला की आक्रमक अशी आहे. पण टी20 क्रिकेटमध्ये तशी संधी मिळत नाही. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ दाखवणं आवश्यक असतं. 2025 या वर्षात गिलने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. पण संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने काही पर्यायच नाही. आता शुबमन गिल वनडे क्रिकेटसाठी तयारी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. विजय हजारे ट्रॉफीत शुबमन गिल पंजाबकडून खेळणार आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. दुसऱ्या सामन्यात चंदीगडविरुद्ध खेळणंही कठीण आहे. कारण सामन्याच्या एक दिवस आधी मोहालीत सराव करत आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.