Career In Designing : ॲनिमेशन, वेब डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन, फॅशन डिझाईन यांत कन्फ्युज होऊ नका ! हे वाचा…

या सगळ्याची माहिती फक्त काहीच जणांना असते. गुगल आहेच पण माहितीचा जर भडीमार होत असेल तर माणूस गोंधळतो. असंच एक गोंधळून टाकणारं क्षेत्र आहे डिझाईनिंगचं. या बद्दलची भरपूर माहिती गुगलवर उपलब्ध आहे. पण डिझायनिंगच्या क्षेत्रात माणूस रिस्क घ्यायला घाबरतो आणि त्याबद्दल जाणून घेतानाच गोंधळतो.

Career In Designing : ॲनिमेशन, वेब डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन, फॅशन डिझाईन यांत कन्फ्युज होऊ नका ! हे वाचा...
Career In DesigningImage Credit source: edumilestones
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 2:01 PM

11वी 12वी जर कला क्षेत्रातून (11th 12th Arts) केली तर खूपच मर्यादित संधी असतात हा लोकांचा गैरसमज आहे. खरं तर कला शाखेनंतर वेगवेगळ्या दिशेला जाता येतं, अनेक संधी (Opportunities) उपलब्ध असतात. या सगळ्याची माहिती फक्त काहीच जणांना असते. गुगल आहेच पण माहितीचा जर भडीमार होत असेल तर माणूस गोंधळतो. असंच एक गोंधळून टाकणारं क्षेत्र आहे डिझाईनिंगचं. या बद्दलची भरपूर माहिती गुगलवर उपलब्ध आहे. पण डिझायनिंगच्या क्षेत्रात माणूस रिस्क घ्यायला घाबरतो आणि त्याबद्दल जाणून घेतानाच गोंधळतो. आज आपण डिझाईनिंग क्षेत्राची (Career In Designing) थोडक्यात माहिती घेऊयात, ज्याने ॲनिमेशन, फॅशन, वेब, इंटेरिअर, ग्राफिक्स या सगळ्या डिझाईनिंग मधला बेसिक फरक लक्षात येईल…

फॅशन डिझाइन

फॅशन डिझायनिंग हे कपडे आणि ॲक्सेसरीजचा वापर कसा केला पाहिजे हे शिकवणारं क्षेत्र आहे. 12 वी कला नंतर फॅशन डिझाईन करिअरचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना पदवी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध असतो. फॅशन डिझाईन मध्ये पण अनेक शाखा आहेत ते खालीलप्रमाणे :

  • फॅशन डिझायनिंग आणि टेक्नॉलॉजी
  • फॅशन मार्केटींग
  • कपडे उत्पादन
  • फॅशन ब्रँडिंग

कापड डिझाईन

कापड वस्त्र डिझाईनमध्ये उद्योगात व्यावसायिक कामासाठी प्रशिक्षित करण्यासाठी फॅब्रिक्स आणि कापडांचे डिटेल्स, त्याचे उत्पादन, विपणन आणि पुरवठा यांचा अभ्यास असतो. टेक्सटाईल इंडस्ट्रीज तंतू, धागा, कापड साहित्य आणि उपकरणे यांच्या निर्मितीचं काम करते.

हे सुद्धा वाचा

इंटेरिअर डिझाईन (आंतरिक नक्षीकाम / Interior Design)

इंटिरिअर डिझायनिंग हा सर्वात लोकप्रिय व्यावसायिक कोर्सपैकी एक आहे. इंटेरिअर डिझायनिर फ्रिलान्सर आर्किटेक्ट किंवा मोठ्या आर्किटेक्चरल फर्ममध्ये बांधकाम, कंत्राटदार किंवा हॉटेल आणि रिझॉर्टमध्ये रोजगार मिळवू शकतात.

ॲनिमेशन आणि मल्टिमीडिया

ॲनिमेशन हे खूप फास्ट बदलणारं क्षेत्र आहे आणि पुढे त्याला खूप चांगले दिवस आहेत असं या क्षेत्रातील तज्ञ म्हणतात. ॲनिमेटर व्हिडिओ गेम, वेबसाइट, चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी एखाद्या गोष्टीला गती, हालचाल देण्याचं काम करतात. यासाठी रीतसर शिक्षण घेणं गरजेचं आहे. अनेक संस्था 12 वी कलां नंतर पदवी, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा आणि ॲनिमेशन प्रमाणपत्र प्रमाणपत्र अभ्यास देतात.

ग्राफिक डिझाइन

ग्राफिक डिझायनिंग ही व्हिज्युअल कम्युनिकेशनची कला आहे जी प्रेक्षकांना माहिती पोहचविण्यासाठी चित्रे, शब्द आणि कल्पना एकत्र करते. ग्राफिक डिझाइनर डिझाईनसाठीचे दृष्टान्त स्पष्ट करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या संगणकाद्वारे स्केचेस किंवा लेआउट तयार करतात. आपण जे जाहिरातींचे बोर्ड बघतो, बॅनर बघतो हा ग्राफिक डिझायनिंगचा भाग आहे. जाहिरात क्षेत्रात ग्राफिक डिझाईनरला प्रचंड मागणी असते.

वेब डिझाईन

वेब डिझाईन आणि विकास हा एक नियोजन आणि एक वेबसाइट तयार करण्याची प्रक्रिया आहे. ब्राउझरमध्ये दिसत असलेलं पेज त्यावर असणारा मजकूर,तिमा, डिजिटल मीडिया किंवा त्यावर दिसणारं एकूणच सगळं डिझाईन हे तयार करायचं काम वेब डिझाईनर करतो. आता इंटरनेट, गुगल, वेब हे सगळं किती महत्त्वाचं आहे हे सांगायची गरज नाहीच. प्रचंड पैसे मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. वेब डिझाइनरची मागणी ही वेगाने वाढत आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.