
दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जातो. शिक्षणाचा प्रचार व्हावा, या उद्देशाने हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता (Literacy is important for any country) अत्यंत महत्त्वाची असते. देशात जेवढे जास्त लोक सुशिक्षित असतील, तेवढी देशाची प्रगती होईल. साक्षरतेचा अर्थ आणि महत्त्व लोकांना कळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळातही अभ्यासाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. ऑनलाइन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. मात्र साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरूवात कधी झाली, त्याचे काय महत्त्व (History and Importance) आहे आणि यावर्षीची थीम काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊ या याविषयीची माहिती…
साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय युनेस्कोने 7 नोव्हेंबर 1965 रोजी घेतला होता. त्यानंतर 1966 साली पहिल्यांदा साक्षरता दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यासाठी 8 सप्टेंबर निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 8 सप्टेंबरला साक्षरता दिन साजरा केला जातो.
शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरुकता वाढावी, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. शिक्षण घेतले तर कोणताही माणूस जीवनात यश मिळवू शकतो. तो प्रत्येक अडचणीला सहज सामोरा जाऊ शकतो. कोणत्याही देशातील साक्षरतेचे प्रमाण अथवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो. देशातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती शिक्षित असणे किती गरजेचे आहे, हे समजावे, यासाठी हा 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिवस साजरा केला जातो.
‘ट्रान्सफॉर्मिग लिटरसी लर्निंग स्पेस ‘ (Transforming Literacy Learning Spaces) ही या वर्षीची साक्षरता दिनाची थीम आहे