CISCE: मुलांनो अभिनंदन ! वर्षातून फक्त एकदाच होणार परीक्षा, निवडक विषयांच्या अभ्यासक्रमात देखील बदल

| Updated on: May 21, 2022 | 4:36 PM

आयसीएसई आणि आयएससीच्या 2023 च्या परीक्षेसाठी निवडक विषयांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. प्रकाशन विभागांतर्गत सीआयएससीईच्या वेबसाइटवर सुधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.

CISCE: मुलांनो अभिनंदन ! वर्षातून फक्त एकदाच होणार परीक्षा, निवडक विषयांच्या अभ्यासक्रमात देखील बदल
जून महिन्यात धोधो निकाल बरसणार!
Image Credit source: facebook
Follow us on

नवी दिल्ली : आयसीएसई (ICSE) आणि आयएससी परीक्षा (ISC Examination) पुढील वर्षापासून वर्षातून फक्त एकदा घेण्यात येणार असल्याचे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) जाहीर केले आहे. यासंदर्भात सीआयएससीईने cisce.org आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत नोटीस जारी केली आहे. ‘सीआयएससीई’ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, शैक्षणिक वर्ष 2023 अखेर ही परीक्षा ‘आयसीएसई’ आणि ‘आयएससी’ या दोन्ही पातळ्यांवर एकदाच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआयएससीईने 2023 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने शाळांना त्यांच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

CISCE च्या वेबसाइटवर सुधारित अभ्यासक्रम उपलब्ध

अनेक निवडक विषयांच्या अभ्यासक्रमात काही बदल करण्यात आले असून, त्याचा तपशील ‘सीआयएससीई’च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असल्याचेही परिषदेने जाहीर केलंय. आयसीएसई आणि आयएससीच्या २०२३ च्या परीक्षेसाठी निवडक विषयांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. प्रकाशन विभागांतर्गत सीआयएससीईच्या वेबसाइटवर सुधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच सर्व विषयांचे सॅम्पल पेपर्स सीआयएससीईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जुलै २०२२ पासून ही कागदपत्रे वेबसाइटवर उपलब्ध होतील, असेही परिषदेने म्हटले आहे.

GPAT 2022 चा निकाल जाहीर

दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीट्यूड टेस्ट (Graduate Pharmacy Aptitude Test) अर्थात GPAT 2022 चा निकाल जाहीर केला आहे. जीपीएटी परीक्षेला बसलेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल तपासू शकतात. जीपीएटी परीक्षा 9 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. जीपीएटी परीक्षा साठी उपस्थित असलेले उमेदवार आता एनटीए nta.ac.in अधिकृत वेबसाईटवर त्यांचे GPAT स्कोअरकार्ड तपासू शकतात. GPAT 2022 च्या स्कोअरच्या आधारे, उमेदवारांना देशभरातील विविध संस्थांमध्ये पीजी लेव्हल फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार किमान गुणांच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजशी संपर्क साधावा लागेल. GPAT पूर्वी एआयसीटीई 2018 सालापर्यंत आयोजित करण्यात येत होती.

हे सुद्धा वाचा

ही परीक्षा 9 एप्रिल रोजी घेण्यात आली होती

एनटीएने जारी केलेल्या सूचनेनुसार ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीट्यूड टेस्ट 2022 साठी 53 हजारांहून अधिक नोंदणी झाली आणि 50 हजारांहून अधिक उमेदवारांनी GPAT 2022 ची परीक्षा दिली. GPAT परीक्षा 121 शहरांमध्ये 336 केंद्रांवर घेण्यात आली होती. उमेदवार GPAT परीक्षेसाठी अंतिम उत्तर-की (Answer Key) देखील तपासू शकतात. एनटीएने GPAT स्कोअरही जारी केला आहे. GPAT परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीनं घेण्यात आली होती.