नववीच्या विद्यार्थ्याने बनवले स्मार्ट शूज, पायी चालल्यावर विजेची निर्मिती

| Updated on: May 08, 2023 | 9:48 PM

पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या सोविक सेठची चर्चा सर्वत्र होत आहे. सोविकच्या छोट्या हातांनी मोठे संशोधन केलंय. या पठ्ठ्यानं असे शूज बनवले त्यातून विजेची निर्मिती होते.

नववीच्या विद्यार्थ्याने बनवले स्मार्ट शूज, पायी चालल्यावर विजेची निर्मिती
Follow us on

नवी दिल्ली : सोविक हा नवव्या वर्गातील विद्यार्थी. काकाच्या दुकानात काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पडल्या होत्या. त्यापासून सोविकने स्मार्ट शूज बनवले. या शूजमध्ये कॅमेरा, जीपीएससारखी सिस्टीम लावण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या सोविक सेठची चर्चा सर्वत्र होत आहे. सोविकच्या छोट्या हातांनी मोठे संशोधन केलंय. या पठ्ठ्यानं असे शूज बनवले त्यातून विजेची निर्मिती होते. या शूजमुळे २००० एमएएचची बॅटरी सहज चार्ज होऊ शकते.

पश्चिम बंगालच्या चंदननगर,हुगळी येथे राहणाऱ्या नववीतील सोविक सेठने यापूर्वीही काही पुरस्कार मिळवले आहेत. आता या विद्यार्थ्याने स्मार्ट शूजचे संशोधन केले. यामुळे मोबाईल, जीपीएस ट्रकिंगपासून कॅमेराही चार्ज होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

स्मार्ट शूजमध्ये लावलाय कॅमेरा आणि जीपीएस

सोविक म्हणतो, या स्मार्ट शूजला बेकार पडलेल्या वस्तूंपासून बनवलं आहे. जवळपास कुणी असेल तर सहज पाहता येते. शूजमध्ये कॅमेरा लावण्यात आलाय. यामुळे सर्व गॅजेट्स शूजच्या खालच्या भागात फिट करण्यात आले आहेत.

आयआयटीमध्ये शिकण्याचे स्वप्न

इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोविकची आवड आहे. पाचवीत शिकत असताना तो काकाच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात बसून काही गोष्टी शिकून घेतल्या. सोविकच्या आईने सांगितले की, सोविक काकाच्या दुकानातून बेकार असलेल्या वस्तू आणत असे. त्यापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असे.

सोविकचे वडील स्वरूप सेठ मिल मजूर आहेत. सोविकने काही वस्तू विकसित केल्या आहेत. त्या व्यवस्थित करण्यासाठी मॅन्यूफॅक्चर कंपनीची गरज आहे. सोविकचे स्वप्न आयआयटीमध्ये शिकण्याचं आहे.

सोविक आपल्या काकांपासून बऱ्याच गोष्टी शिकला. बेकार असलेल्या वस्तूंचा वापर करून वेगवेगळ्या चांगल्या वस्तू बनवू लागला. याचा भविष्यात त्याला फायदा होणार आहे. सोविकच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.