AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Drug Probe:  आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, राजीनाम्याची मागणी अंधारेंचा सनसनाटी आरोप

Satara Drug Probe: आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, राजीनाम्याची मागणी अंधारेंचा सनसनाटी आरोप

| Updated on: Dec 19, 2025 | 1:30 PM
Share

सातारा ड्रग प्रकरणी सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले आहे. ड्रग फॅक्टरीतील आरोपींना एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या तेजयश हॉटेलमधून जेवण पुरवल्याचा आरोप अंधारेंनी करत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर शंभूराज देसाईंनी अंधारेंच्या आरोपांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील सनसनाटी ठरवले.

सातारा ड्रग प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर आणि त्यांच्या बंधूंवर गंभीर आरोप केले आहेत. साताऱ्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी एका ड्रग फॅक्टरीवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर समोर आलेल्या माहितीवरून अंधारेंनी हे आरोप केले आहेत. अंधारेंच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी ज्या ड्रग फॅक्टरीवर कारवाई केली, त्या फॅक्टरीतील आरोपींना जेवण पुरवले जात होते. हे जेवण तेजयश नावाच्या हॉटेलमधून येत होते. अंधारेंनी दावा केला आहे की, हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे.

या आरोपांच्या समर्थनार्थ, अंधारेंनी पत्रकार परिषदेत गुगल मॅप आणि व्हॉट्सअॅप लिंकचा लाईव्ह डेमो सादर केला. त्यांनी दाखवले की, गुगल मॅपवर तेजयश हॉटेलचे लोकेशन आणि व्हॉट्सअॅप बुकिंग लिंकवर प्रकाश शिंदे यांचे नाव दिसत आहे. “आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या गंभीर आरोपांनंतर, सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे केली. “जर एखाद्या ठिकाणी मंत्रीपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या.

Published on: Dec 19, 2025 01:30 PM