Online Education : महाराष्ट्राचं पुढचं पाऊल, ऑनलाईन विद्यापीठाच्या स्थापनेचा मानस, समितीची स्थापना

Online Education : महाराष्ट्राचं पुढचं पाऊल, ऑनलाईन विद्यापीठाच्या स्थापनेचा मानस, समितीची स्थापना
प्रातिनिधिक फोटो

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाराष्ट्रात ऑनलाईन विद्यापीठ (Online University) स्थापन करण्याबाबत विचार सुरु केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 10, 2021 | 11:04 AM

मुंबई: कोरोना विषाणू (Corona) संसर्गामुळं शिक्षण (Education) क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा रद्द करणाव्या लागल्या. महाराष्ट्रात शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वजण ऑनलाईन शिक्षणाकडे (Online Education) वळले. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाराष्ट्रात ऑनलाईन विद्यापीठ (Online University) स्थापन करण्याबाबत विचार सुरु केला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनं गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर. के. शेगांवकर यांच्याकडे देण्यात आलं आहे.

समिती ऑनलाईन विद्यापीठ स्थापनेबद्दल अहवाल देणार

महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या समितीला राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि ऑनलाईन विद्यापीठाचं स्वरुप, रचना यासंदर्भात अभ्यास करुन अहवाल सादर करायचा आहे. याशिवाय परदेशातील ऑनलाईन विद्यापीठांचं स्वरुप, त्यांच काम कशा स्वरुपात चालतं याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

भारतात ऑनलाईन विद्यापीठ असल्यास त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना

राज्य शासनानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार भारतातील एखाद्या राज्यात राज्य पातळीवरील ऑनलाईन विद्यापीठ स्थापन केलं असल्यास त्याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये ऑनलाईन विद्यापीठाचं स्वरुप, अभ्यासक्रम, लेक्चर्स, अभ्यासक्रम साहित्य, शिक्षक आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, परीक्षा, परीक्षांचे निकाल, ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम यांसदर्भात अभ्यास करुन अहवाल राज्य सरकारला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन विद्यापीठ आणि पारंपारिक विद्यापीठ यांचे अभ्यासक्रम यांच्यातील साम्य आणि भिन्नता यासंदर्भात देखील तुलनात्मक अभ्यास करुन ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अहवाल सादर करण्यात येईल.

इतर बातम्या :

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ ; ‘या’ तारेखेपर्यंत करता येणार अर्ज

HSC SSC Exam : ओमिक्रॉनचा फटका, दहावी बारावी परीक्षेचं वेळापत्रक लटकलं, मूल्यांकनाचा पर्यायी फॉर्म्युला तयार?

Maharashtra Government Education department will be start online university set up committee for study

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें