पोरांनो दफ्तर सोडा आणि खेळायला चला, राज्य शासनाचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम

महाराष्ट्र शासन पहिली आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम राबवणार आहे. 'हॅपी सॅटर्डे' असं या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात मोठा फायदा होणार आहे.

पोरांनो दफ्तर सोडा आणि खेळायला चला, राज्य शासनाचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 9:34 PM

शाळा ही माणसाला घडवते. चांगल्या आणि वाईट गोष्टींची पारख करायला शिकवते. आयुष्यभर पुरतील अशा चांगल्या सवयी लावते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासा व्यतिरिक्त व्यक्तीमत्व विकासाला महत्त्व देते. विद्यार्थ्यांचे कलागुण आणि रूची ओळखून क्रीडा, कला, चित्रकला सारख्या विविध विषयांबाबत शिक्षण देते. शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. सध्याच्या काळात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली आहे. विद्यार्थी आजकाल मैदानी खेळ खेळण्यापेक्षा फक्त मोबाईल किंवा कम्प्युटरवर गेम खेळणं जास्त पसंत करतात. यामुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होतोच, यासोबत मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावरही त्याचा परिणाम पडतो. या सर्व गोष्टींचा विचार करता राज्य शासन पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय नाविण्यपूर्ण असा उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासन नवा उपक्रम आणणार आहे. ‘हॅपी सॅटर्डे’ असं या उपक्रमाचं नाव आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होणार आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हॅपी सॅटर्डे हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारच्या दिवशी मुलांनी वही, पुस्तक, दप्तर शाळेत आणायचे नाही.

या दिवशी विद्यार्थ्यांना शेती, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार, मैदानात घेऊन जाण्यात येईल. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.