SSC exam : दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न फसला, राज्यभरात 15 विद्यार्थ्यांवर कारवाई

| Updated on: Mar 22, 2022 | 7:56 AM

राज्यात सध्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा सुरु आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.

SSC exam : दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न फसला, राज्यभरात 15 विद्यार्थ्यांवर कारवाई
Exam
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे: राज्यात सध्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा सुरु आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉपी सारखे गैरप्रकार होत असल्यानं त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. काल राज्यभरात झालेल्या दहावीच्या हिंदी पेपरमध्ये कॉपी (malpractices) करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात एकूण 15 विद्यार्थ्यावर ही कारवाई करण्यात आलीय. कॉपीसारखे प्रकार टाळा असं आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं केलंय. काल झालेल्या दहावीच्या हिंदीच्या पेपरला राज्यभरात एकूण 15 विद्यार्थ्यावर ही कारवाई करण्यात आलीय. यामध्ये सर्वाधिक पुणे विभागात 13 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबई विभागात दोघांवर ही कारवाई करण्यात आलीय. कॉपीसारखे प्रकार टाळा, असं आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं केलंय.

बारावीच्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये 11 जणांवर कारवाई

17 फेब्रुवारीला झालेल्या बारावीच्या बायोलॉजी पेपरमध्ये 11 जणांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक कारवाई ही अमरावती विभागात 6 जणांवर करण्यात आली होती. तर लातूरमध्ये 2,औरंगाबादमध्ये 2 , मुंबई 1 जणावर कारवाई झाली होती. कॉपी केल्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड करणार कडक कारवाई, असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं.

गैरप्रकार करणाऱ्या शाळांवर कारवाई

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सध्या सुरु असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या शाळा गैर प्रकार करतील त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येतील असा इशारा दिला आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे,यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे,लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

महाराष्ट्राच्या राजभवनात बोगस डॉक्टरेटचं वाटप, अधिकाऱ्यांवर कारवाई होणार??

Dowry | सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल संचालकावर गुन्हा, बायकोकडे 25 लाखांचा तगादा?